विश्वचषक होतोय त्या देशात शतकी खेळी केल्यावर रहाणे म्हणाला…

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने बुधवारी(22 मे) काउंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून खेळताना नॉटींगहॅमशायर विरुद्ध शतकी खेळी केली. रहाणेने या सामन्यातून काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

रहाणेने या सामन्यातील दुसऱ्या डावात 197 चेंडूत 119 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार मारले. तसेच याच डावात हॅम्पशायरचा कर्णधार सॅम नॉर्थइस्टनेही 186 चेंडूत 133 धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर रहाणे आणि नॉर्थइस्टनेने तिसऱ्या विकेटसाठी 257 धावांची भागीदारी करत त्यांच्या संघाला भक्कम स्थितीत उभे केले.

रहाणेने या शतकी खेळीनंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्रिकइन्फोने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये रहाणेने म्हटले आहे की ‘मी माझ्या कामगिरीमुळे आनंदी आहे. माझी योजना ही फक्त फलंदाजी करत राहणे एवढीच होती. मी धावांबद्दल विचार करत नव्हतो. मला खेळपट्टीवर जाऊन माझ्या संघाला चांगल्या स्थितीत आणायचे होते आणि माझ्यासाठी हे काम करुन गेले.’

तसेच पहिल्यांदाच काउंटी क्रिकेटमध्ये खेळणारा रहाणे म्हणाला, ‘इथे फलंदाज म्हणून शिस्त असणे महत्त्वाचे आहे. मी फलंदाजीतील योजनेबद्दल माझ्या संघसहकाऱ्यांशी चर्चा करत असतो. मी एक साधी योजना आखतो आणि त्याला अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो.’

याबरोबरच हॅम्पशायरने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रहाणेने नॉर्थइस्टबरोबर केलेल्या द्विशतकी भागिदारीबद्दलही आपले मत मांडले आहे. तो म्हणाला, ‘मला खरंच मजा आली. पण मी ज्याप्रकारे बाद झालो त्यामुळे निराश आहे. आम्हाला त्या भागीदारीची गरज होती.’

‘आम्ही सकाळी कठिण परिस्थितीत होतो. त्यामुळे आम्हाला भागीदारीची गरज होती. आम्ही चांगली कामगिरी केली. माझ्यासाठी हे खास होते.’

रहाणे काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतक करणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी पियूष चावलाने ससेक्स संघाकडून तर मुरली विजयने एसेक्स संघाकडून काउंटी क्रिकेटमध्ये पदापर्णाच्या सामन्यात शतक केले होते.

या सामन्यात हॅम्पशायरने 244 धावांनी विजय मिळवला आहे. त्यांनी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 310 धावा केल्या होत्या. तर नॉटिंगहॅमशायरने पहिल्या डावात सर्वबाद 239 धावा केल्या. त्यामुळे नॉटिंगहॅमशायरला 71 धावांची पिछाडी स्विकारावी लागली.

दुसरा डाव हॅम्पशायरने 5 बाद 367 धावांवर घोषित केला आणि नॉटींगहॅमशायरला 439 धावांचे आव्हान दिले आहे.  या आव्हानाचा पाठलाग करताना नॉटींगहॅमशायरला सर्वबाद 194 धावाच करता आल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

मिस्टर ३६० एबी डीव्हिलीयर्सचे ते स्वप्न आजही आहे अधुरे

विराटला हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हवा आहे भारतीय संघात…

विराट कोहलीच्या मते हा संघ वनडेमध्ये करेल सर्वप्रथम ५०० धावा