हे ३ आहेत सध्याच्या क्रिकेटमधील नॉटी बॉय

पोर्ट एलिझाबेथ । भारताने पाचव्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत ४-१ अशी आघाडी घेतली. तसेच तब्बल २५ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत विजय मिळवला.

या सामन्यात सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यावर त्याला कागिसो रबाडाने ‘सेंड ऑफ’ देतात तशे हातवारे केले. यामुळे आयसीसीच्या खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेचा भंग झाला. यामुळे त्याची सामना फीमधील १५% रक्कम कापण्यात आली. तसेच तो दोषी आढल्यामुळे त्याला १ demerit पॉईंट देण्यात आला आहे.

यामुळे हा खेळाडू वर्षभरापेक्षा कमी कालावधीतच पुन्हा दोन कसोटी सामन्यांच्या बंदीच्या जवळ आला आहे.

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. परंतु आधीही दोषी आढळल्यामुळे त्याच्या खात्यात आता एकूण ५ गुण जमा झाले आहेत. यामुळे आता तो पुन्हा दोषी आढळला तर त्याला दोन कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात येणार आहे.

यापूर्वी फेब्रुवारी २०१७मध्ये डिकवेल्लाबरोबर केपटाउन कसोटीत वाद झाले तेव्हा ३ demerit पॉईंट, बेन स्टोक्सला सेंड ऑफ दिल्यामुळे १ demerit पॉईंट असे त्याच्या खात्यात एकूण ४ demerit पॉईंट जमा झाल्यामुळे त्याला एक कसोटी सामन्यांची बंदी घालण्यात आली होती तर काल त्याला पुन्हा १ demerit पॉईंट मिळाल्यामुळे एकूण demerit पॉईंटची संख्या आता ५ झाली आहे.

demerit पॉईंट हे खेळाडू २४ महिन्यात जेवढ्या वेळा दोषी आढळला आहे यावर ठरते. demerit पॉईंटवरून त्या खेळाडूचे फक्त मानधन कमी करायचे की त्याला निलंबनाचे पॉईंट्स (Suspension Points) द्यायचे हे ठरते.

यातील पहिल्या २ demerit पॉईंटला खेळाडूची सामना फी मधून रक्कम कमी केली जाते. जेव्हा हे demerit पॉईंट ८ होतात तेव्हा खेळाडूवर एक वर्ष ते जीवनभर खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते.

कोणत्या खेळाडूंचे आहेत सर्वात जास्त demerit पॉईंट –

निरोशन डिकवेलला
या यादीत अव्वल स्थानी श्रीलंकेचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलला आहे. त्याचे ७ फेब्रुवारी २०१७पासून आजपर्यंत एकूण ७ demerit पॉईंट झाले आहेत. जर त्याचे हे demerit पॉईंट ६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत ८च्या वर गेले तर त्याच्यावर १ वर्ष ते आजीवन बंदी येऊ शकते.

रवींद्र जडेजा
या यादीत दुसऱ्या स्थानी रवींद्र जडेजा असून त्याचे demerit पॉईंट सध्या ६ आहेत. ९ ऑक्टोबर २०१६ पासून त्याच्या खात्यावर हे demerit पॉईंट जमा झाले आहेत. येत्या ८ महिन्यात जडेजाची मैदानावरील कोणतीही चुकीची कृती त्याला १ वर्ष ते आजीवन बंदीकडे नेऊ शकते.

कागिसो रबाडा
२२ वर्षीय कागिसो रबाडावरच्या नावावरही सध्या ५ demerit पॉईंट असून ७ फेब्रुवारी २०१७पासून त्याच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे यापुढे त्याला १ वर्ष जर खेळभावनेच्या विरुद्ध केलेली कोणतीही कृती महाग ठरू शकते.

जडेजा सोडून २५ सप्टेंबर २०१६पासून कोणत्याही भारतीय खेळाडूच्या नावावर कोणताही demerit पॉईंट नाही. महिला खेळाडूंमध्ये मात्र वेडा कृष्णमूर्तीच्या नावावर २ आणि हरमनप्रीत कौरच्या नावावर १ demerit पॉईंट आहेत.