मुंबईत आजपासून राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचा थरार.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय दत्त क्रीडा मंडळ (रजि.) आयोजित राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ मार्च ते १० मार्च या कालावधीत किरण बाळू शेलार, क्रीडांनगरी राजाभाऊ साळवी उद्यान, प्रभादेवी येथे ही स्पर्धा होणार आहे.

“स्वप्नसाफल्य चषक” यानावाने खेळवल्या जाणाऱ्या यास्पर्धेत ४ जिल्ह्यातील एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील नामवंत कुमार संघ सहभागी होणार असून त्याचे ४ गटात विभाजन केले आहे. आज सायंकाळी (६ मार्च) स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

सदर स्पर्धा मातीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सुरुवातीला साखळी सामने त्यानंतर बादफेरीचे खेळवण्यात येतील. पहिली तीन दिवस साखळी सामने खेळवण्यात येणार असून चौथ्या दिवशी उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. स्पर्धेच्या अंतिम दिवशी उपांत्य सामने व अंतिम सामना खेळवण्यात येईल.

राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेची गटवारी:-

अ गट:- दुर्गामाता स्पोर्ट क्लब (मुंबई), सह्याद्री मित्र मंडळ (उपनगर), शिवशंकर क्रीडा मंडळ (ठाणे)

ब गट:- एस. एस. जी. फाउंडेशन (मुंबई), पार्ले स्पोर्ट्स क्लब (उपनगर), विकास क्रीडा मंडळ (मुंबई)

क गट:- सिद्धी प्रभा फाउंडेशन (मुंबई), श्री राम (पालघर), ग्रीफिन जिमखाना (ठाणे)

ड गट:- जय दत्तगुरू कबड्डी संघ (मुंबई), जागर स्पोर्ट क्लब (उपनगर), विजय क्लब (मुंबई)

आज होणारे सामने:- (६ मार्च २०१९)

१) दुर्गामाता स्पोर्ट क्लब विरुद्ध सह्याद्री मित्र मंडळ

२) विकास क्रीडा मंडळ विरुद्ध पार्ले स्पोर्ट्स

३) सिद्धी प्रभा फाउंडेशन विरुद्ध ग्रीफिन जिमखाना

४) विजय क्लब विरुद्ध जागर स्पोर्ट क्लब