नशिबाची साथ आणि धवनला मिळालं श्रीलंका दौऱ्याचं तिकीट!

पहिल्या डावात १९० धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु आपण ऐकून आश्चर्यचकित व्हाल की हा फलंदाज या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला परिवाराबरोबर सुट्ट्यांचा आनंद घ्यायला जाणार होता.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ९ जुलै रोजी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात शिखर धवनचे नाव नव्हते. त्यामुळे वेस्ट इंडिजवरील मालिकेनंतर हा फलंदाज थेट हाँग काँग येथे परिवाबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत होता. धवन तिथून ऑस्ट्रेलियाला परिवाराबरोबर रवाना होणार होता परंतु भारताचा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुरली विजयने दुखापतीमुळे या मालिकेतुन माघार घेतली.

तरीही धवनला किती संधी मिळेल याबद्दल शंका होती कारण संघात अभिनव मुकुंद आणि केएल राहुल हे पूर्णवेळ सलामीवीर होते. सामन्याला दोन दिवस बाकी असताना केएल राहुलला तापामुळे सामन्यात भाग घेता आला नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात जबदस्त कामगिरी करणाऱ्या धवनला संघात स्थान देण्यात आले.

नशिबामुळे मिळालेल्या संधीचे सोने करत धवनने पहिल्या डावात १९० धावांची जबदस्त खेळी केली. अभिनव मुकुंदनेही दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी आहे. तर २५ मार्चला धरमशाला कसोटीमध्ये दोनही डावात अर्धशतकी खेळी होती परंतु तो दुखापतीमुळे तेव्हापासून संघाबाहेर होता.

श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात या तीन खेळाडूंपैकी कर्णधार विराट कोहली कुणाला संधी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.