अबब! ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याला मिळणार एवढी मोठी रक्कम

मेलबर्न । ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून आज उपांत्यफेरीचे सामने झाले. ग्रँडस्लॅम स्पर्धात गेल्या काही वर्षांपासून महिला आणि पुरुषांच्या विजेत्याला बक्षिसाची रक्कम सारखीच दिली जाते.

ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या महिला आणि पुरुष एकेरीच्या विजेत्याला तब्बल ४० लाख ($4 million )ऑस्ट्रेलियन डॉलर दिले जाणार आहेत. ही रक्कम जर रुपयांत मोजली तर ती अंदाजे २० कोटी एवढी होते.

उपविजेत्याला २० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे १० कोटी), उपांत्यफेरीमध्ये पराभूत झालेल्या खेळाडूंना ८ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर ( अंदाजे ४.५ कोटी), उपांत्यपूर्व फेरीमधील पराभूत खेळाडूला ४.४० लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे २.२६ कोटी) रुपये मिळणार आहेत.

पुरुष व महिला दुहेरीमधील विजेत्या जोडीस ७ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे ३.५ कोटी), उपविजेत्या जोडीस ३.५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे १.७९ कोटी) रुपये मिळणार आहेत.

मिश्र दुहेरीतील विजेत्या जोडीस १.७५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर (अंदाजे ८९ लाख रुपये) मिळणार आहेत.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या पहिल्या फेरीपासून ते विजेत्या खेळाडूपर्यंत सर्वांना पैसे मिळतात. अगदी पुरुष आणि महिला एकेरीची पात्रता फेरी खेळणाऱ्या खेळाडूंनाही यात ठराविक रक्कम मिळते.

२०१५च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला बक्षीस म्हणून आयसीसीने $3,975,000 अंदाजे २५ कोटी रुपये दिले होते.