जर नदाल पॅरिस मास्टर्स जिंकला तर होणार हे मोठे विक्रम

पॅरिस । स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याला पहिल्या फेरीतून पुढे चाल मिळाली आहे.

स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्पर्धेत खेळत नसल्याकारणामुळे नदाल या स्पर्धेत अनेक विक्रम सहज करू शकतो. त्यातील सर्वात महत्वाचा विक्रम म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटी नदाल एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहू शकतो.

-नदाल या स्पर्धेत अजून एक सामना जिंकला तर तो चौथ्या वर्षअखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम राहू शकतो. तो यापूर्वी २००८, २०१० आणि २०१३ या वर्षांच्या अखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी होता.

-नदालने जर पॅरिस मास्टर्सचे विजतेपद जिंकले तर त्याचे एटीपी मास्टर्स प्रकारातील हे ३१ वे विजेतेपद असेल. आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला एटीपी मास्टर्स स्पर्धेचे ३० पेक्षा जास्त विजेतेपद जिंकता आलेले नाही.

एटीपी मास्टर्स स्पर्धेची सर्वाधिक विजेतेपदं ही नदाल (३०) आणि जोकोविच (३०) यांनी जिंकली आहेत तर फेडररने एटीपी मास्टर्सची २७ विजेतेपद जिंकली आहेत.