असे आहेत युएफा चॅम्पियन्स लीगचे सर्व गट

आज युएफा चॅम्पियन्स लीगचे गट घोषीत करण्यात आले तसेच यावेळी मागील मौसमातील सर्व पुरस्कारांचे वितरण झाले.

४ पाॅटमधील ३२ संघांचे ८ गटात विभाजन झाले. आणि त्यांच्या सामन्यांचे वेळापत्रक ड्रां नंतर २ तासात घोषीत करण्यात येतात. तसेच याबरोबर मागील मौसमातील सर्वोत्तम गोलकिपर, बचावपटू, मिडफिल्डर आणि फाॅर्वर्ड यांना पुरस्कार दिले.

कोणाला मिळाला कोणता पुरस्कार?
सर्वोत्कृष्ठ गोलकिपर:- नवास (रियल मॅड्रिड)
सर्वोत्तम बचावपटू:- सर्जीओ रामोस (रियल मॅड्रिड)
सर्वोत्तम मिडफिल्डर:- लुका मोड्रिक (रियल मॅड्रिड)
सर्वोत्तम फाॅर्वर्ड:- क्रिस्टायानो रोनाल्डो (रियल मॅड्रिड)
महिला सर्वोत्तम खेळाडू:- हार्डर
पुरुष सर्वोत्तम खेळाडू:- लुका माॅड्रिक

३ वर्ष सलग युसीएल जिंकणाऱ्या रियल मॅड्रिडचे पुरस्कार सोहळ्यात वर्चस्व राहिले.

कोणत्या गटात आहेत कोणते संघ?
मागील ३ वर्षांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या रियल मॅड्रिडला ‘ग’ गटात स्थान मिळाले असून मागील वर्षी बार्सिलोनाला घरचा रस्ता दाखवणाऱ्या रोमाचा या गटात समावेश आहे. तर युरोपा लीगच्या विजेत्या ॲटलेटिको डी मॅड्रिडला ‘अ’ गटात डोर्डमंड आणि मोनॅको बरोबर स्थान मिळाले आहे.

‘ब’ गटात बार्सिलोना, टोट्टेन्हम हाॅटस्पर्स बरोबरच इंटर मिलनचा समावेश असल्याने या गटात उलटफेर होऊ शकतात. तर मॅन्चेस्टर सिटीला तुलनेने सोपा असा ‘फ’ गट मिळाला आहे. त्या तुलनेने त्यांचे प्रतिस्पर्धी मॅन्चेस्टर युनाएटेडला ‘ह’ गटात जुवेंटस आणि वॅलेंसियाचे तगडे आव्हान असेल.

‘क’ गटात पीएसजीला मागील वर्षाचे उपविजेते लीवरपुल आणि नापोलीचे आव्हान असेल तर बायर्न मुनिचला ‘इ’ गटात बेन्फिका आणि ॲजेक्सचे आव्हान असेल. तर ‘ड’ गटात पोर्टो, लोकोमोटिव, शाल्के या संघांचा समावेश आहे.

युसीएलचा पहिला सामना १९ सप्टेंबर ला असेल तर अंतिम १६ ची फेरी १३ फेब्रुवारी पासुन असेल. उपांत्यपुर्व फेरी १० एप्रिलला तर उपांत्य फेरी १९ एप्रिल पासुन सुरु होईल

या मौसमाचा अंतिम सामना २ जून २०१९ ला ॲटलेटिको डी मॅड्रिडच्या घरच्या मैदानावर असेल.

असे असतील सर्व गटातील संघ:-

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

 ५२६ कसोटी सामन्यांत टीम इंडियाकडून पहिल्यांदाच असे घडले

 अश्विन चौथ्या कसोटीत चमकला, कुंबळे- भज्जीच्या यादीत सामील

 तिसरी कसोटी: खराब सुरुवातीनंतर सॅम करनने इंग्लंडला सावरले

एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक