IPL 2018- विसलपोडू एक्सप्रेसचे पुण्यात जंगी स्वागत

पुणे | आयपीएलमध्ये मोठा चाहता वर्ग असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची खास ट्रेन आज सकाळी पुण्याला पोहचली. काल या विशेष ट्रेनने चेन्नई सुपर किंग्जच्या १००० चाहत्यांना घेऊन पुण्याकडे प्रवास सुरू केला होता. 

या विशेष ट्रेनला विसलपोडू एक्सप्रेस असे नाव देण्यात आले होते. ही चेन्नईच्या चाहत्यांची विसलपोडू एक्सप्रेस सकाळी सोलापूर येथे पोहचली होती. महाराष्ट्रात सर्वच स्टेशनवर या ट्रेनचे स्वागत करण्यात आले. 

या प्रवासाबद्दल  चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल माध्यंमांवरून सतत माहिती देण्यात येत होती. 

आज राजस्थान राॅयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पुण्यातील एमसीएच्या स्टेडीयमवर होत आहे. यासाठी हे चाहते खास चेन्नईवरून पुण्यात आले आहे. 

हे सर्व चाहते पुणे स्टेशनवर उतरले आहेत. जर ह्या महिन्यात आम्हाला ट्रेन उपलब्ध झाल्या तर आम्ही चेन्नईकर चाहत्यांसाठी पुण्यातील सर्व सामन्यांसाठी ट्रेनचे नियोजन करणार आहोत असे या संघाच्या व्यवस्थापनाकडून आधीच सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –