अबब! विराट कोहली वापरतो एवढी महागडी बॅट

भारतीय क्रिकेट संघाचा तिन्ही प्रकारातील कर्णधार विराट कोहली हा सध्या खोऱ्याने धावा काढतो आहे असे बोलले जाते. क्रिकेटच्या तीनही प्रकारात हा खेळाडू तब्बल ५० ची सरासरी राखून कामगिरी करत आहे. ज्या बॅटने विराट ह्या धावा काढतो तिची किंमत किंमत ऐकून अवाक व्हाल.

क्रिकवीझ्झ या वेबसाइटच्या म्हणणाऱ्यानुसार विराट कोहली हा इंग्लिश विल्लोवच्या अ प्रकारातील बॅट वापरतो. जिची अंदाजे किंमत ही २०,००० रुपयांपर्यंत आहे.

बॅटची किंमत ही तिच्यावर असणाऱ्या रेषा ठरवते. ह्या रेषांचा उपयोग मुख्यत्वे चांगला फटका मारण्यासाठी होतो. ६ ते १२ रेषा असलेली बॅट ही क्रिकेटमध्ये उच्च दर्जाची समजली जाते. भारतीय कर्णधार वापरात असलेली बॅट ही ८ ते १२ रेषांची आहे. तिची अंदाजे किंमत ही १७ हजार ते २३ हजार दरम्यान आहे.

यापूर्वी बॅटसाठी वापरण्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सर्वात जास्त पैसे घेत असे परंतु सध्या विराट हा यासाठी सर्वात जास्त पैसे घेतो. विराट सध्या बॅटवर लावत असलेल्या MRF कंपनीच्या जाहिरातीसाठी वर्षाला ८ कोटी रुपये मोजतो.