इतक्या दिवसाची प्रतिक्षा असलेला एमएस धोनीचा तो विक्रम अखेर पूर्ण

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आज (12 जानेवारी) पहिला वनडे सामना सुरु आहे. हा सामना सि़डनी क्रिकट ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 289 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

यावेळी फलंदाजीला आलेल्या भारताची अवस्था फारच बिकट झाली आहे. 3.5 षटकातच भारताने 4 धावांवर तीन विकेट्स गमावल्या आहेत. तर रोहित शर्मा नाबाद 11 आणि एम एस धोनी नाबाद 3 धावांवर खेळत आहे.

या सामन्यात धोनीने एका खास विक्रमला गवसणी घातली आहे. यामध्ये त्याने एक धाव घेताच भारताकडून वन-डे मध्ये 10 हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे. हा विक्रम करणारा धोनी पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

भारताकडून याआधी 10 हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहलीने पार केला आहे.

धोनीने भारताकडून आत्तापर्यंत 329 सामन्यात 49.74 च्या सरासरीने 9999 धावा केल्या होत्या. यात त्याने 9 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत.

तसेच धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 331 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 3 वनडे सामने हे आशियाई एकादश संघाकडून खेळला आहे. या तीन सामन्यात मिळून त्याने 174 धावा केल्या आहेत.

यावेळी फलंदाजीला आलेल्या शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही. त्याला जेसन बेऱ्हेनडॉर्फ पायचीत केले. कर्णधार विराट कोहलीही 3 धावा करत झे रिचर्डसनच्या गोलंदाजीवर मार्कस स्टोइनिसला झेल देत बाद झाला. तर अंबाती रायडूलाही रिचर्डसनने शून्य धावेवर असताना पायचीत केले.

भारताला जिंकण्यासाठी 38 षटकांमध्ये 263 धावा करण्याची गरज आहे. यासाठी भारताकडे 7 विकेट्सच शिल्लक आहेत.

भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-

18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)

11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)

10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)

10235 धावा – विराट कोहली (217 सामने)

10000* धावा – एमएस धोनी (329 सामने)

महत्त्वाच्या बातम्या-

ऍरॉन फिंचची विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा दिग्गजांच्या यादीत समावेश

हार्दिक पंड्या, केएल राहुल ऐवजी या खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी

अँडी मरेची यावर्षीची विंब्लडन असेल शेवटची स्पर्धा