नेमारच्या पॅरिस सेंट जर्मनमध्ये अंतर्गत वाद ?

पॅरिस सेंट जर्मन टीम मागील ३-४ महिन्यांपासुन काही ना काही गोष्टींमुळे चर्चेत आहे. आधी मार्को वेरात्तीच्या बार्सिलोनाकडे जाण्याच्या बातमी मुळे तर नंतर बार्सिलोनाचा युवा स्टार नेमारच्या विक्रमी खरेदी मुळे. इथेच सगळ्या गोष्टी थांबल्या नाहीत ट्रान्स्फ़रच्या विंडोला अवघे काही दिवस बाकी असताना मोनॅकोचा स्टार कायलियन मबाप्पेला त्यांनी घेतले.

युएफाच्या ‘फायनांशिअल फेयर प्लेचे’ उल्लंघन होऊ नये म्हणुन त्याला लोनवर घेतले. तसेच फुल राईट बॅक डॅनीला सुद्धा त्यांनी जुवेंटसकडुन विकत घेतले. पॅरिस सेंट जर्मनचा अटॅक ‘एमसीएन’ ( मबाप्पे, कवानी, नेमार) ने ओळखला जातोय आणि हीच टीम युसीएलची प्रबळ दावेदार मानली जातेय.

पण काल एक नविनच चित्र पहायला मिळाले, पॅरिस सेंट जर्मनला मिळालेली फ्री किक घ्यायला कवानी पुढे आला पण डॅनीने बाॅल स्वताच्या हातात घेत तो कवानीला दिलाच नाही तर तो नेमारच्या हातात दिला आणि नेमारने ती फ्री किक घेतली. हे सगळ इथेच थांबल नाही तर ७९ व्या मिनिटला मिळालेली पेनल्टी कवानी घेत असताना नेमारने जवळ जाऊन पेनल्टी किक मागीतली. पण कवानी आधी घडलेली घटना कदाचीत विसरला नसेल त्यामुळे त्यानेच ती पेनल्टी घेतली पण त्याचे गोल मध्ये रुपांतर नाही करु शकला.

नेमार आणि कवानी मधला हा कदाचीत इगोचा प्राॅब्लेम असु शकतो पण हा पॅरिस सेंट जर्मनला महागात पडू नये म्हणजे झाले.

काय आहे ‘एफएफपी’
एफएफपी (फायनांशिअल फेयर प्ले) हे क्लबच्या कमाई पेक्षा जास्त खर्च करण्याऱ्या क्लबवर लगाम लावण्यासाठी युरोपियन फुटबाॅल असोसिएशनचे युनियन बनवले आहे. अतिरिक्त खर्चामुळे त्यांना पुढच्या वाटचालीत अडचण येऊ नये याची एफएफपी खबरदारी घेतं.

 

नचिकेत धारणकर (टीम महा स्पोर्ट्स)