एकवेळ तर मी प्रेक्षक होऊन रोहितची फलंदाजी पाहत होतो – श्रेयस अय्यर !

मोहाली।श्रीलंका संघाविरुद्ध दुसऱ्या वनडेत रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली. त्याचे हे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या खेळीत त्याने तब्बल १२ षटकार खेचले.

त्याने २०१७ यावर्षात २०वनडेत फलंदाजी करताना ७५.६४च्या सरासरीने १२८६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४५षटकारांचा आणि ११६चौकरांचा समावेश आहे.रोहित आज जेव्हा ही फटकेबाजी करत होता तेव्हा त्याच्या बरोबर मैदानात त्याचा मुंबईकर संघसहकारी श्रेयस अय्यर होता.

जेव्हा श्रेयसने ५०चेंडूत अर्धशतक केले तेव्हा रोहित १११चेंडूत ९८धावांवर खेळत होता आणि जेव्हा ७०चेंडूत ८८धावा करून परतला तेव्हा रोहितने १३६चेंडूत १६०धावा केल्या होत्या.हे सर्व याची देही याची डोळा पाहायला मिळालेला श्रेयस म्हणतो, ” मी दुसऱ्या बाजूला एक प्रेक्षक झालो होतो.

मी त्याला देण्यासाठीच खेळत होतो. हा पूर्णपणे रोहित शर्माचा सामना होता. आम्ही काल नेटमध्ये चांगली फलंदाजी केली आणि आता त्याचे फळ मिळाले. ही खेळपट्टी चांगली होती. चेंडू बॅटवर चांगला येत होता. “”आम्ही ४०व्या षटकांपर्यंत काहीही घाई करणार नव्हतो कारण आमच्याकडे चांगली फलंदाज बाकी होते. आम्हाला माहित होते की जरी आमच्यातील एकजण शेवटपर्यंत खेळला तरी मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो. एक वेळ तरअशी आली होती की मी केवळ रोहितची फलंदाजी पाहत होतो. “