आयपीएलमध्ये निवड झालेल्या त्या दोन चुलत भावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत सेलिब्रेशन

जयपुर | आयपीएल २०१९लिलावात आज दोन चुलत भावांना चांगलीच किंमत मिळाली. त्यात प्रभसिमरन सिंगला पंजाबने तब्बल ४.८० कोटी रुपयांना संघात घेतले. तर अनमोलप्रीत सिंगला मुंबई इंडियन्सने ८० लाख रुपयात आपल्या ताफ्यात सामील केले.

अनमोलप्रीतचे वडिल सतविंदर सिंग हे हॅण्डबॉल प्लेयर असून त्यांना क्रिकेटमध्ये एवढा रस नाही. मात्र त्यांच्या मुलांनी हा खेळ खेळण्यास त्यांची काहीच हरकत नव्हती.

आयपीएलमध्ये मुलांची निवड झाल्यावर सतविंदर यांना खूप आनंद झाला. त्यांनी बॅकयार्डमध्ये हॅण्डबॉलच्या गोल पोस्टऐवजी क्रिकेटचे नेट लावले आहे. तर प्रभसिमरनचे वडिल सुरजीत सिंग मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यासाठी उत्सुक आहेत.

“जेव्हा मुंबईने अनमोलला संघात घेतले तेव्हा आम्ही मिठाई वाटून आनंद साजरा केला होता. पण जेव्हा प्रभसिमरनसाठी बोली सुरू होती तेव्हा आम्ही भांगडा करत होतो. यामध्ये आमचे शेजारीही आमच्यासोबत नाचत होते. हा जल्लोष मध्यरात्रीपर्यत सुरूच होता”, असे सुरजीत यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या या मोठ्या खेळाडूला संघातून डच्चू

आयपीएल- एकवेळ दिल्ली गाजवलेला खेळाडू आता मुंबईच्या ताफ्यात