तेव्हा नातेवाईकसुद्धा मितालीच्या क्रिकेट खेळण्यावरून आमची खिल्ली उडवायचे : लीला राज (मिताली राजची आई)

0 73

मिताली राजची आई लीला राज यांनी एकवेळ मितालीच्या क्रिकेट खेळण्यावर लोक आणि नातेवाईक खिल्ली उडवत असल्याचं सांगितलं आहे. मितालीच्या सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाचसुद्धा त्यांनी यावेळी कौतुक केलं आहे.

द हिंदू दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, ” मितालीने ६००० धावा ह्या विश्वचषकात केल्या ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा मी आधी तिला या विक्रमाबद्दल विचारायची तेव्हा ती कोणत्यातरी परदेशी खेळाडूच नाव घेत असत. त्या परदेशी खेळाडूच्या नावावर तिच्यापेक्षा १००० धावा जास्त असल्याचंही मितालीने सांगितलं होत.”

“मला नेहमी हे रेकॉर्ड भारतीय खेळाडूंच्या नावावर असावे असे वाटायचे. दुसरी अभिमानाची गोष्ट म्हणजे तिने कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा करण्याचा केलेला विक्रम. त्यात २००२ साली तिने २१४ धावांचा खास विक्रम केला होता. ”

मितालीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना त्या म्हणतात, ” तेव्हा आम्हाला नातेवाईक आणि अनेक लोकांकडून मितालीच्या खेळण्यावर चिडवणे किंवा खिल्ली उडवणे असे प्रकार केले जायचे. ”

“चांगली टीम विश्वचषक जिंकेल. आणि भारताने ज्या प्रमाणे ऑस्ट्रेलिया संघाला हरवले आहे त्यातील हरामनप्रीत कौरची खेळी लालजबाब होती. ” अंतिम सामन्याबद्दल विचारले असता त्यांनी नमूद केले.

Comments
Loading...
%d bloggers like this: