एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत थरमॅक्स, इन्फोसिस, बार्कलेज संघांची विजयी सलामी

पुणे । राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे व नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्स, रॅडिसन ब्लू(हिंजेवाडी) संलग्नतेने आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत थरमॅक्स, इन्फोसिस, बार्कलेज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत थरमॅक्स संघाने डीलॉईट संघाचा 8-1असा धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून आनंद तोमरने(3, 27,42मि.)तीन गोल, अभिषेक भावे(12, 16मि.)व रोहित कुमार 18,25मि.)यांनी दोन गोल, तर केएल दिपकने एक गोल केला.

अनुप नायर याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर बार्कलेज संघाने हनीवेल संघाचा 2-1असा पराभव केला. इन्फोसिस संघाने सायबेज संघाचा 3-1असा, तर फिनआयक्यु संघाने विप्रोचा 2-1असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. अन्य लढतीत कॅपजेमिनी संघाने कन्व्हर्जीज संघाला 1-1असे बरोबरीत रोखले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
बार्कलेज: 2(अनुप नायर 2, 32मि.)वि.वि.हनीवेल: 1(सारथ 15मि.);
इन्फोसिस: 3(सतीश 1मि., धीरज 10मि., विल्सन लोबो 18मि.)वि.वि.सायबेज: 1(चारुदत्ता 9मि.);
फिनआयक्यु: 2(प्रकाश थोरात 2, 8मि.)वि.वि.विप्रो: 1(अमित गायकवाड 5मि.);
थरमॅक्स: 8(केएल दिपक 4 मि., आनंद तोमर 3, 27,42मि., अभिषेक भावे 12, 16मि., रोहित कुमार 18,25मि.)वि.वि.डीलॉईट: 1(मिलिंद हळगेकर 8मि.);
कॅपजेमिनी: 1(अश्विन व्ही 6मि.)बरोबरी वि.कन्व्हर्जीज: 1(मुजाफर शेख 52मि.).