जाणून घ्या कोणता क्रिकेटपटू भरतो सर्वाधिक टॅक्स

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या आयकर अर्थात टॅक्स भरण्याची सार्वधिक चर्चा होते. अक्षय कुमार प्रमाणेच अन्य बॉलीवूड सेलिब्रिटी किती टॅक्स भारतात हे आपण माध्यमांमधून आजपर्यत ऐकलेच आहे.

परंतु आपणास हे माहित आहे का की देशातील कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक टॅक्स भरतो. हा क्रिकेटपटू आहे भारताचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी. धोनीची कमाईची मुख्य माध्यमे ही तो खेळत असलेले आंतरराष्ट्रीय सामने, भारतात होणारी इंडियन प्रीमियर लीग, तो करत असलेल्या विविध कंपन्यांच्या जाहिराती तसेच तो काही कंपन्यांच्या पदावर आहे यातून येते.

मागील वर्षी सार्वधिक टॅक्स हा धोनीने ४८ कोटी तर कोहलीने ४२ कोटी भरला होता. ऑगस्ट २०१६ पर्यंत कोहलीकडे १३ ब्रॅण्ड्स होते ज्यात एडीडास, अॉडी, बूस्ट, कोलगेल-पामोलिव, हर्बललाइफ, एमआरएफ, नितेश एस्टेट, पेप्सीको, स्माश, टिसॉट, टीवीएस मोटर्स, यूनाइटेड स्पिरिट्स आणि विक्स यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी या खेळाडूने प्यूमा कंपनीबरोबर १०० कोटींची डील केली आहे.

विशेष म्हणजे आता क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सचिनला ४ वर्ष झाली आहे तरीही या महान क्रिकेटपटूच्या ब्रँड त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. सचिन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून तो अंदाजे दरवर्षी १८ ते १९ कोटी रुपये टॅक्स भरतो.