सामना संपल्यावर टीम इंडियातील या दोन खेळाडूंना ३० मिनीटांनीच सुरु केला सराव

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहेत.

भारताने पहिल्या सामन्यात जरी विजय मिळवला असला तरी सलामीवीर केएल राहुल आणि मुरली विजय यांचा फॉर्म काळजीचा विषय बनला आहे. म्हणूनच या दोघांनी दुसऱ्या कसोटीसाठी लगेचच सरावाला सुरूवात केली आहे.

पर्थमध्ये 14 डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यासाठी विजयी लय कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ १००% प्रयत्न करणार आहे. मात्र त्यासाठी सलामीवीरांच्या खेळाकडे लक्ष असणार आहे. तसेच त्यांच्या या खराब फॉर्ममुळे अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी नाराजीही व्यक्त केली आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात विजय आणि राहुलने यांनी अनुक्रमे 11 आणि 2 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या डावामध्ये राहुलने 44 धावा केल्या मात्र विजयला 18च धावा करता आल्या. यासाठी पहिला सामना संपला असता या दोन भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यासाठी सरावाला सुरूवात केली आहे.

दुसऱ्या डावात राहुलला सुर गवसला असून विजयचा खराब फॉर्म मात्र कायम आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या:

५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा

विजयानंतर संघातील १० खेळाडू होते खूश तर एकटा इशांत होता नाराज

वार्नर- स्मिथपैकी फक्त या खेळाडूला विराट करतो मेसेज