जाणून कोणत्या अभिनेत्री आवडतात भारताच्या या दोन युवा खेळाडूंना

आज बीसीसीआयने एक विडिओ पोस्ट केला आहे ज्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने भारतीय युवा गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत रोहितने त्यांना प्रश्न विचारला की “तुमची आवडती अभिनेत्री कोण आहे.”

या प्रश्नाचे उत्तर देताना युवा फिरकी गोलंदाज चहलने सांगितले मला कॅटरिना कैफ आवडते. तर रोहितच्या या प्रश्नाचे उत्तर भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने “जॅकलिन फर्नांडिस” असे दिले.

नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया वनडे मालिकेत या दोन्हीही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. युजवेंद्र चहलने ५ सामन्यांच्या मालिकेत ४ सामन्यात ६ बळी घेतले होते तर कुलदीप यादवने एक हॅट्ट्रिक घेत ७ बळी घेतले होते.