ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले

विंडीजच्या संघातील शाय होप आणि शिमरॉन हेटमेयर यांची सध्याची कामगिरी लक्षात घेता विंडीजचा संघ तिसरा विश्वचषक जिंकू शकतो, असे मत विंडीजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्रावोने मांडले आहे.

आयसीसी पुरूषांचा 2019चा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्स येथे मे-जूूलै दरम्यान खेळला जाणार आहे. विंडीजचा संघ आयसीसी क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. तसेच त्यांनी 1975 आणि 1979ला विश्वचषक जिंकला आहे.

ब्रावोने यावर्षीच ऑक्टोबमध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच त्याने विंडीजप्रमाणे 10व्या स्थानावर असलेला अफगानिस्तानमध्येही विश्वचषक जिंकण्याची धमक आहे असे म्हटले आहे.

“विंडीजच्या संघात बहुतांश तरूण खेळाडू आहेत. त्यांच्या बरोबरच ख्रिस गेल आणि मार्लोन सॅम्युएल्स हे दोन वरिष्ठ खेळाडू आहेत. पण सध्या विश्वचषकासाठी संघ निवडला नसला तरी हे दोघे संघात असतील. तसेच कर्णधार जेसन होल्डर पण यावेळी संघात असणार आहे”, असे ब्रावोने स्पष्ट केले.

“होप आणि हेटमेयर या दोघांनी कमी कालावधीत उत्तम कामगिरी करत आपले कौशल्य दाखवले आहे. त्यांच्याकडे विश्वचषकात खेळण्याची संधी आहे.”

अफगानिस्तानच्या संघानेही मागील काही वर्षांत त्यांची कामगिरी सुधारली आहे. ते आणि आयर्लंड हे दोन नवीन संघ आहेत ज्यांनी नुकतेच कसोटी सामने खेळायला सुरूवात केली आहे.

“या वेळेस सर्वांनाच विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. मात्र अफगानिस्तानचा संघ हा चांगली टक्कर देऊ शकतो”,असे ब्रावाने म्हटले आहे.

ब्रावाने सर्व प्रकारच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी सध्या तो अनेक टी20 लीगमध्ये खेळत आहे. त्याने कॅरिबियन, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीगचे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 451 विकेट्स आणि 6023 धावा केल्या आहेत. सध्या तो दक्षिण आफ्रिकेच्या टी20 लीगमध्ये खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम

अॅडलेड कसोटीत शतकी खेळी केलेल्या चेतेश्वर पुजाराला या कारणासाठी हवे ‘चॉकलेट मिल्कशेक’

चेतेश्वर पुजाराच्या ‘स्टिव्ह’ या टोपन नावामागचे रहस्य शेन वॉर्नने उलगडले