पावसामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० सामना रद्द

हैद्राबाद। आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी २० मालिकेतील शेवटचा सामना होणार होता. परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने आजचा सामना रद्द करावा लागला.

हैद्राबादमध्ये गेल्या आठवडाभर पाऊस पडत आहे. त्यामुळे या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवली गेली होती. सुरवातीला नाणेफेकीलाही विलंब झाला होता. परंतु नंतर सामना सुरु करण्यात पावसामुळे अडचणी येत राहिल्या. अखेर सामानाधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकही झाली नाही.

हा सामना टी २० मालिकेतील निर्णायक सामना होता. मालिकेतील या आधी झालेल्या दोन सामन्यात भारताने एक तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती.

सामना रद्द झाल्याने मालिका १-१ ने बरोबरीत संपली. बीसीसीआयने ट्विटर वरून ही माहिती दिली.