तिसऱ्या कसोटीत आर अश्विन टीम इंडियाचा कर्णधार?

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीत आर अश्विनकडे कर्णधारपदाची धुरा येऊ शकते. जर तिसऱ्या कसोटी सामन्यात सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अंतिम संघात संधी मिळाली नाही आणि कर्णधार विराट कोहली जर या सामन्यासाठी फीट नसेल तर नेतृत्वाची धुरा अश्विनकडे येऊ शकते.

रविवारी दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ एक डाव आणि १५९ धावांनी पराभूत झाला. त्यामुळे यजमाने इंंग्लंड संघाने मालिकेत २-० असा विजय मिळवला.

त्यामुळे मालिकेत विजय मिळवणे भारतीय संघाला जवळपास अशक्यच आहे. राहिलेल्या ३ सामन्यात भारतीय संघ केवळ पत राखण्यासाठीच खेळताना दिसणार आहे. यामुळे संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.

लाॅर्ड कसोटीत संघ केवळ पराभूतच झाला नाही तर कर्णधार कोहलीही जखमी झाला आहे. त्यामुळे संघासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

तो तिसऱ्या कसोटीत खेळेल की नाही याबद्दल मोठी शंका आहे. त्यात रहाणेच्या खराब फाॅर्मचा विचार करता त्याला या सामन्यात संधी मिळेल किंवा नाही याबद्दल मोठी चर्चा आहे.

त्यामुळे संघातील एक अनुभवी खेळाडू म्हणुन आर अश्विनकडे पाहिले जात आहे. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणुन इशांत शर्मा आहे. परंतु त्याला कर्णधार पदाचा कोणताही खास अनुभव नाही.

अश्विनने किंग्ज ११ पंजाबचे या हंगामात कर्णधारपदही सांभाळले होते. तसेच त्याने या मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे त्याच्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडू शकते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण

टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सने केला खास विक्रम