भारतीय संघ देणार अँटी-डोपिंगचा संदेश

तिरुवनंतपुरम । येथील क्रिकेटप्रेमींना भारतीय संघातील क्रिकेटप्रेमींना आज भेटण्याची तसेच पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलँड सामन्याच्या पूर्वसंधेला आज ३ वाजता चंद्रशेखर नायर स्टेडियमवर भारतीय संघ तसेच न्यूझीलँड संघ येणार आहे. 

दोन्ही संघ आज केरळ पोलीसने सुरु केलेल्या अँटी-डोपिंग कॅम्पेनमधील ‘एस टू क्रिकेट अँड नो टू ड्रग्ज’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम पोलिसांना भारतीय कर्णधार आणि बाकी खेळाडूंकडून अँटी-डोपिंग कॅम्पेनचा फुगा हवेत सोडण्यात येणार आहे. तसेच खेळाडू तरुण पिढीला अँटी-डोपिंगचा संदेश देणार आहे. 

“आम्ही दोन्ही संघाच्या व्यवस्थापनशी चर्चा झाली आहे. शिवाय आमचे बोलणे भारतीय क्रिकेट बोर्डाशीही झाले आहे. त्यांनी खेळाडू उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. परंतु खेळाडूंची यादी आज मिळणार आहे. ” असे पोलीस अधीक्षक मनोज अब्राहम म्हणाले.