Video: सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाला लागली भूक आणि मग काय घडले ते पहाच

पर्थ । क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू प्रामुख्याने चाहत्यांना सही देतात किंवा आजकाल चाहते खेळाडूंबरॊबर सेल्फी काढतात. परंतु हे यापेक्षा खूप वेगळे आहे.

मिचेल मार्श जेव्हा २०१५मध्ये Ashes मालिकेत इंग्लंड देशात एका सामन्यात क्षेत्ररक्षण करत होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. एका सत्रात अतिशय संथ खेळ सुरु असताना एका चाहत्यांच्या आग्रहाखातर मार्शने त्याच्याकडील एक केकचा तुकडा घेऊन त्याचा आस्वाद घेतला.

हे करताना त्याने दोन चेंडूच्या मधील वेळ घेतला. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने चांगले क्षेत्ररक्षण करत चेंडू अडवला आणि संघासाठी ४ धावा वाचवत योगदान दिले.

सध्या हा २ वर्ष जुना व्हिडीओ चांगलाच गाजत आहे.