या माजी खेळाडूला वाटते धोनीला संघात स्थान देणे चुकीचे !

भारताचा माजी कर्णधार, पहिल्या टी२० विश्वचषकाचा विजेता कर्णधार, २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार, महेंद्रसिंग धोनीला आता संघात स्थान देणे चुकीचे आहे असे भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरचे मत आहे.

महेंद्रसिंग धोनी मागील काही मालिकेपासून फॉर्ममध्ये नाही त्यामूळे धोनीने आता निवृत्ती घ्यावी का अशी दबक्या आवाजात चर्चा होण्यास सुरूवात होऊ लागली. अनेक क्रिकेट पंडितांनी धोनीने टी२० क्रिकेटमधून तरी निवृत्ती घ्यावी असे ही बोलले आहे.

आगरकराच्या मते दिनेश कार्तिक हा आता यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघात येऊ शकतो. दिनेश कार्तिक हा पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्यास समर्थ आहे आणि टी२० क्रिकेटमध्ये ते गरजेचे आहे.

आगरकराच्या मते तिसऱ्या टी२० सामन्यात विराटने धोनीच्या जागी दिनेश कार्तिकला संधी द्यायला हवी होती. आगरकरने हे मान्य ही केले की धोनीला संघातून काढणे अवघड आहे आणि विराट हे करणार नाही. दुदैवाने हा सामना पावसामुळे काल वाया गेला.

आगरकर हा भारतासाठी वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.