रहाणेसह टीम इंडियाचे हे खेळाडू परतले भारतात

सिडनी। भारताने सोमवारी(7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास रचला. आता या दोन संघात 12 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे.

त्यामुळे भारताच्या वनडे संघात जागा न मिळालेले भारताचे काही खेळाडू परत भारतात परतले आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल, मुरली विजय आणि आर अश्विन या खेळाडूंचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आलेला नाही.

त्यामुळे ते भारतात परतत असतानाचा फोटो अगरवाल आणि रहाणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रहाणेने फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘येथील आठवणी घेऊन चाललो आहे.’

View this post on Instagram

Taking back memories from Down Under. #TeamIndia

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी एमएस धोनी, केदार जाधव, युजवेंद्र चहल आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात पोहचले आहेत.

तसेच आजच(8 जानेवारी) बीसीसीआयने माहिती दिली आहे की भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या ऐवजी मोहम्मद सिराजचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी मालिकेतील स्टार रिषभ पंतला वनडे संघातून या कारणामुळे वगळले

रिषभ पंतचा नादच खुळा! आज पुन्हा धोनीचा कसोटी क्रमवारीचा विक्रम मोडला

आयपीएल २०१९चा थरार रंगणार या देशात!

कसोटी मालिकेत शानदार विजय मिळणारी टीम कोहली होणार मालामाल