पहा: कुलदीप यादवने २०१४लाही घेतली होती हॅट्रिक विकेट

कोलकाता । कुलदीप यादवने काल ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना हॅट्रिक विकेट घेतली. भारताकडून वनडेत हॅट्रिक घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. चेतन शर्मा आणि कपिल देव हे दोंन्ही वेगवान गोलंदाज होते तर कुलदीप यादव हा अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे.

परंतु अनेक क्रिकेटप्रेमींना हे माहित नसेल की कुलदीप यादवने अंडर-१९च्या विश्वचषकात २०१४ साली स्कॉटलँड संघाविरुद्ध हॅट्रिक विकेट घेतली होती. अंडर-१९ वनडे सामन्यात आणि आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज आहे.

विशेष म्हणजे या दोंन्ही वेळी समालोचन कक्षात हर्षा भोगले होते.

पहा त्याचा हा विडिओ: