या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू केदार जाधवला बुधवारी (25ऑक्टोबर) जाहीर झालेल्या संघनिवडीमध्ये जागा मिळाली नाही. या गोष्टीचे जाधवला आश्चर्य वाटले आहे. तर जाधवला संघात न घेण्याचे कारण संघनिवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

संघनिवड समितीने विंडीज विरुद्धच्या पाच वनडे सामन्यातील उर्वरीत तीन सामन्यांसाठी 15 जणांची संघामध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये जाधवला संघात स्थान मिळाले नाही.

“मला याबद्दल काहीही माहित नाही. पण यामागचे काही कारणही समजले नाही. सध्या संघात नसल्याने पुढच्या काही गोष्टीचा विचार नाही केला. मात्र शक्यतो मी रणजी ट्रॉफीमध्ये खेळेल”, असे जाधव म्हणाला.

दुसरीकडे प्रसाद यांनी जाधवला अजून देशांतर्गत सामने खेळण्याची गरज आहे नंतर आम्ही त्याला संघात घेऊ असे मत व्यक्त केले आहे.

“जाधवची आतापर्यतची दुखापतीबद्दल विचार करता आम्ही त्याला सध्या संघात न घेण्याचे ठरवले आहे. याआधीही असे घडले की तो फिट होऊन संघात आला आहे आणि नंतर त्याला दुखापतींचा त्रास झाला आहे. जर इंडीया ए आजचा सामना जिंकली असती तर त्यांना परत एक सामना खेळावा लागला असता तर त्यावरून आम्ही जाधवच्या फिटनेसबद्दल समजले असते”, असे प्रसाद म्हणाले.

“कदाचित आम्ही त्याला अतिरिक्त खेळाडू म्हणून संघात जागा देऊ शकतो. पण संघनिवड करतानाची प्रक्रिया वेगळीच असते हे खेळाडूंनी समजून घ्यावे”, असेही प्रसाद म्हणाले.

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (इंडीयन प्रीमियर लीग) चेन्नई सुपर किंगकडून खेळणाऱ्या जाधवला सुरूवातीलाच हॅमस्ट्रींगची दुखापत झाल्याने संपुर्ण मोसमाला मुकावे लागले होते. तसेच नुकत्याच झालेल्या एशिया कपमध्ये या 33 वर्षीय खेळाडूला अंतिम सामन्यात फलंदाजी करताना त्रास होत होता.

संघनिवड समितीने विंडीज विरुद्धच्या पाच वनडे सामन्यातील उर्वरीत तीन सामन्यांसाठी  गोलंदाज मोहमद शमीला स्थान दिले नाही तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

तसेच उद्या (27 ऑक्टोबर) पुण्यात तिसरा वनडे सामना होणार असून या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. तर 24 ऑक्टोबरला झालेला दुसरा वनडे सामना बरोबरीत सुटला.

अशी आहे उर्वरित मालिकेसाठी टीम इंडिया- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायडू, रिषभ पंत, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव. युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, केएल राहुल, मनीष पांडे

महत्त्वाच्या बातम्या:

कर्णधार कोहली संघासाठी करु शकतो ही गोष्ट एका षटकात सहा वेळा

पुण्यातील वन-डे क्रिकेटचा इतिहास कुणाच्या बाजूने?