प्रो कबड्डी: जेव्हा छोट्या चाहत्याला मिळतो वाढदिवसाचा खास केक

रोहित कुमार आणि बंगळुरू बुल्स संघाचे चाहते तुम्हाला भारतभर मिळतील. रोहित हा प्रो कबड्डीमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. लहान मुलांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्व रोहितच्या कबड्डीमधील कौशल्याचे दिवाने आहे.

असाच एक चाहता लहान मुलगा आहे केवन्न शाह. हा मुलगा रोहितचा खूप मोठा फॅन आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आवडत्या खेळाडू सोबत सेल्फी काढावा म्हणून तो बंगळुरू बुल्स राहत असलेल्या हॉटेलात गेला आणि सांगितले की, ” माझा जन्मदिवस आहे आणि मला तुझ्यासासोबत सेल्फी काढायचा आहे.”

तेव्हा कर्णधार रोहितने लगेच केक मागविण्यास सांगितला आणि केवन्न सोबत केक कापून त्याचा जन्मदिवस साजरा केला. फक्त सेल्फी काढायला गेलेल्या फॅनला आवडत्या खेळाडू सोबत केक कापण्यास मिळावा म्हणजे दूध शर्करा योगच!

रोहित कुमार सुद्धा असाच अक्षय कुमारचा मोठा फॅन आहे त्यामुळे चाहत्यांच्या भावना आणि प्रेम काय असत हे रोहितला चांगलंच माहित आहे.