ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरे, सेरेना विल्यम्स करणार पुनरागमन

ऑस्ट्रेलियन ओपन 2019साठी राफेल नदाल, रॉजर फेडरर, अॅंडी मरे आणि सेरेना विल्यम्स यांची नावे स्प्ष्ट झाली आहेत. मेलबर्न येथे होणारी ही स्पर्धा जानेवारी महिन्यात सुरू होणार असून यामध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या 102 क्रमांकाच्या महिला आणि पहिल्या 101 क्रमांकावर असलेल्या पुरूष टेनिसपटूंचा समावेश आहे.

सेरेनाने ८ आठवड्यांची गरोदर असताना 2017चे विजेतेपद जिंकले असून ती या स्पर्धेत पुनरागमन करत आहे. 2018च्या विम्बल्डन आणि युएस ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाला पराभूत व्हावे लागले होते. यामुळे ती या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून महिला एकेरीत सर्वाधिक 24 ग्रॅन्ड स्लॅम मिळवणाऱ्या मार्गारेट कोर्ट यांची बरोबरी करू शकते.

तसेच नदाल आणि मरे हे दोघेही दुखापतीमधून सावरले असून ते ही या स्पर्धेत खेळण्यासाठी फिट आहेत. गतविजेते फेडरर आणि कॅरोलिन वोझनीयाकी हे पण या स्पर्धेत खेळणार आहेत. तर नोवाक जोकोविच याचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी टेनिसपटू रॉय इमरसन प्रमाणेच फेडरर आणि जोकोविच या दोघांनी प्रत्येकी सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

“नवीन हंगामासाठी आम्ही तयार असून गतविजेत्यांचा खेळ पुन्हा बघण्याचा विशेष आनंद होतो”, असे या स्पर्धेचे आयोजक क्रेग टिले म्हणाले.

या स्पर्धेच्या आयोजकांना निवड झालेल्या टेनिसपटूंनी या स्पर्धेत खेळण्याबाबत होकार दिला आहे. मात्र महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत 74व्या क्रमांकावर असलेली पोलंडची अग्नीएसझ्का रडवानस्का हीने नुकतिच निवृत्ती जाहिर केल्याने ती या स्पर्धेत खेळणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

सुनील गावसकर, कपिल देव निवडणार भारतीय महिला संघाचा नवीन प्रशिक्षक?

अॅडलेड कसोटीसाठी अंतिम १२ जणांच्या टीम इंडियामध्ये या खेळाडूंना मिळाले स्थान

रमेश पोवारांना पाठिंबा देणाऱ्या हरमनप्रीत कौरवर संजय मांजरेकरांची कडक शब्दात टीका