प्रीमियर लीग: फुटबॉलपटूने तब्बल पाच वर्षानंतर केलेला गोल ठरतोय चर्चेचा विषय

प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात टोटेनहॅम हॉटस्परने न्युकॅसल युनायटेडचा २-१ असा पराभव करत तीन गुणांची कमाई केली.

टोटेनहॅम  या सामन्याच्या पहिल्याच सत्रात आक्रमक खेळ करत हे तीन गोल केले. यामध्ये टोटेनहॅमच्या जॅन वेर्टोनघेनने ८व्या मिनिटाला केलेला पहिला गोल नेटच्या रेषेवर फक्त ९ मिलीमीटर अंतर एवढाच पुढे गेला होता.

प्रीमियर लीगने त्यांच्या अधिकृत ट्विवरवरून ही पोस्ट शेयर केली असता चाहत्यांनी त्याला चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या.

पण हा गोलच होता हे पंचानी दिले तरीही यावर चर्चा या झाल्या.

“या फुटबॉलमधील यंत्रनेचा मी चाहता झालो आहे”, असे वेर्टोनघेन म्हणाला.

वेर्टोनघेनचा पाच वर्षातील प्रीमियर लीगमधील हा पहिलाच गोल होता. त्याने २०१३मध्ये स्वानसी विरुद्ध या लीगचा शेवटचा गोल केला होता. त्यानंतर त्याला १६१ लीग सामने खेळूनसुद्धा गोल करण्यात अपयश आले होते.

वेर्टोनघेन बरोबरच डेले अलीने १८व्या तर न्युकॅसलच्या जोसेलूने ११व्या मिनिटाला गोल केले. वेर्टोनघेन आणि जोसेलू या दोघांच्या गोलमध्ये १४९ सेंकदाचाच फरक होता.

या विजयी सुरूवातीनंतर टोटेनहॅमचा या लीगचा पुढील सामना फुलहॅम विरुद्ध आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रियल माद्रिद सोडण्याविषयी रोनाल्डोने दिले स्पष्टीकरण

टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सने केला खास विक्रम