Video: तीन दिवसांत क्रिकेटमध्ये झाले तीन विचित्र धावबाद

सध्या क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत असे अनेक स्पर्धा चालू आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसात तीन विचित्र धावबाद क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळाले आहेत. याचे व्हिडिओही सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

त्यातील काल(18 आॅक्टोबर) अबुधाबी येथे पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज अझर अलीही विचित्र पद्धतीने बाद झाला.

या सामन्यातील पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील 53 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर अझर अलीने चेंडू सीमारेषेकडे मारला. अझर अली आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या असाद शफिकला वाटले की चेंडूने सीमारेषा पार केली. त्यामुळे सुरुवातीला ते धाव घेण्यासाठी धावले होते पण ती पुर्ण न करता एकमेकांशी चर्चा करत राहिले.

त्याचवेळी सीमारेषेवरुन मिचेल स्टार्कने चेंडू सरळ यष्टीरक्षक टीम पेनकडे दिला. पेनने क्षणाचाही विलंब न लावता अझर अलीला धावबाद केले.

त्याचबरोबर हा धावबाद झाल्यानंतर गुरुवारीच(18 आॅक्टोबर) शिफिल्ड शिल्ड या आॅस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेट मालिकेत पुन्हा एक विचित्र धावबाद पहायला मिळाला.

क्विन्सलॅंड विरुद्ध टास्मानिया संघात सुरु असलेल्या 4 दिवसीय सामन्यात हा धावबाद पहायला मिळाला.

यात फलंदाजी करत असलेल्या खेळाडूने फटका मारल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही धाव घेताना त्याचे लक्ष पुर्णपणे क्षेत्ररक्षककाडे होते. त्यामुळे समोरून येत असलेल्या नाॅनस्ट्राईकरकडे त्याचे लक्ष गेले नाही आणि हे दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले.

यामुळे ज्याने फटका मारला तो फलंदाज खाली पडला तर जो नाॅन स्ट्राईकच्या बाजून पळत होता त्याला मात्र पोहचायला उशीर झाल्यामुळे तो धावबाद झाला.

तसेच न्यूझीलंडमधील प्लंकेट शिल्ड स्पर्धेतही एक असाच विचित्र धावबाद पहायला मिळाला. यामध्ये फलंदाजाने फटका मारल्यानंतर त्याने एक धाव पूर्ण केली पण त्यानंतर एक धाव काढून नॉन स्ट्रायकरला आलेला फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी धावताना तोल गेल्याने खाली पडला.

त्यात दुसरा फलंदाज क्षेत्ररक्षकाकडे पाहत दुसऱ्या धावेसाठी धावत असताना तोही घसरुण पडला. त्यामुळे धावबाद करणे क्षेत्ररक्षकांना सहज सोपे झाले.

महत्त्वाच्या बातम्या:

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून

-टाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू

नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम