Video: तेव्हा तो बॅट विसरला होता आणि आता तर

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फवाद अहमद आणि वस्तू विसरणे हे आता नवीन राहिले नाही. मार्च महिन्यात शेफील्ड शिल्ड स्पर्धेत फलंदाजीला येताना हा खेळाडू चक्क बॅट विसरला होता.

आता त्याच्या पुढे जात त्याने ह्या वेळी चक्क एकाच हाताचे दोन ग्लोव्ज फलंदाजीला येताना आणले होते. हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा परत ड्रेसिंग रूममध्ये परत जात त्याने दुसऱ्या हाताचा ग्लोव्ज आणला.

याचा खास विडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिक्टोरिया विरुद्ध क्वीन्सलँड यांच्यातील सामन्यात जेव्हा तो फलंदाजीला येत होता तेव्हा तो अचानक मागे फिरला आणि पुन्हा संघासहकाऱ्यांना तिथूनच सांगितले की तो चुकीचा ग्लोव्ज घेऊन आला आहे.

यावर एक छान कॅप्शन देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट केला आहे की चला फवाद दिवसेंदिवस चुका कमी करत आहे. गेल्या वेळी बॅट होती यावेळी ग्लोव्ज आहे.