पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण

दुबई | आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली आहे.

या सामन्यात संघाचे कर्णधारपद टीम पेनकडे कायम ठेवण्यात आले असुन या सामन्यात चक्क तीन खेळाडू कसोटी पदार्पण करणार आहेत. त्यात तब्बल ९३ वन-डे खेळलेल्या अॅराॅन फिंचसह मर्न्युस लॅबुस्चेंग आणि ३९ वन-डे खेळलेल्या ट्रॅविस हेडचाही समावेश आहे.

गोलंदाजीची धुरा या सामन्यात मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नेथन लायन आणि जाॅन हाॅलंड जोडीवर असेल.

पहिल्या कसोटीसाठी टीम आॅस्ट्रेलिया- उस्मा ख्वाजा, अॅराॅन फिंच, शाॅन मार्श, मिचेल मार्श, ट्रॅविस हेड, मर्न्युस लॅबुस्चेंग, टीम पेन (कर्णधार), मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नेथन लायन आणि जाॅन हाॅलंड

या कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलिया २ कसोटी सामने खेळणार असुन पहिला ७-११ आॅक्टोबर दरम्यान दुबई येथे तर दुसरा सामना १६-२० आॅक्टोबर दरम्यान आबु धाबी येथे होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

वाढदिवस विशेष: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?

दोन्ही हातांनी गोलंदाजी करत या गोलंदाजाने रुट, मॉर्गनला टाकले गोंधळात

भावनिक रविंद्र जडेजाने कसोटीतील पहिले शतक केले या व्यक्तीला समर्पित