असे आहेत आयपीएल २०१८ तिकीटांचे दर

आयपीएल २०१८ ला ७ एप्रिल रोजी सुरूवात होत आहे. भारत तसेच जगभरातील चाहत्यांना आता या स्पर्धेचे वेध लागले आहेत. 

या वर्षी आयपीएल तिकीटांचे दर हे ४०० रुपयांपासून २६,००० रुपयांपर्यंत आहेत. हे दर प्रत्येक संघानुसार बदलतात. प्रत्येक फ्रंचायझीने यासाठी वेगवेगळे तिकीट दर आकारले आहेत. 

या स्पर्धेतील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सने वानखेडेवरील सामन्याचे दर ८०० पासून ८००० रुपयांपर्यंत ठेवले आहेत. जयपूर येथे होणाऱ्या सामन्यांसाठी राजस्थानने ५०० रुपयांपासून दर ठेवले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या सामन्याचे दर ५०० पासून २६,००० रुपयांपर्यंत ठेवले आहेत तर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने १,३०० पासून ते ६,५०० पर्यंत हे दर निश्चीत केले आहेत. 

 

बाकी फ्रंचायझींनीही तिकीट दर याच दरम्यानच ठेवले आहेत.