पहिल्या वनडे सामन्याची सर्व तिकीटे संपली !

चेन्नई । ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकीटांची किंमत जास्त असल्याकारणाने प्रेक्षक पाठ फिरवतील हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला आहे.

१० सप्टेंबरपासून या सामन्यांसाठी तिकीटविक्री सुरु झाली होती. तिकिटांची किंमत ही १२०० पासून सुरु होत होती. यात १२०० रुपये, २४०० रुपये, ४८०० रुपये, ८००० रुपये आणि १२,००० रुपयांच्या तिकिटांचा समावेश होता.

ऑनलाईन आणि मैदानाजवळील स्टॅन्डवर मिळणारी सर्व तिकिटे संपली आहेत. bookmyshow.com वर पहिले असता सर्व विभागातील तिकिटे Sold Out हा संदेश दिसतो. @CricketAus या ट्विटर अकाउंटने देखील विविध स्टॅन्डची ऑफलाईन तिकिटे संपल्याचा फोटो शेअर केला आहे.

तामिळनाडू क्रिकेट असोशिएशनने अतिशय कमी तिकीटे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्याची ओरड चाहते सोशल माध्यमांवर करत आहेत तर काही चाहते मिळालेली तिकीटे ऑनलाइन माध्यमातून विकत आहेत.