भावांनो मी अशी कोणतीही मुलाखत भारतीय पेपरला दिलीच नाही- मिशेल जाॅन्सन

आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनने भारताच्या एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचे खंडन केले आहे. त्याने म्हटले आहे की त्याने अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही.

रविवारी टाइम्स आॅफ इंडियाच्या वेबसाइटवर जॉन्सनची ही मुलाखत प्रकाशित झाली होती. या मुलाखतीत दिल्याप्रमाणे त्याने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले होते. पण आता त्याने ट्विट करत त्याने असे काहीही तो बोलले नसल्याचे म्हटले आहे.

या मुलाखतीतील भाग आयसीसीनेही त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केला होता. मात्र यावरही जॉन्सनने प्रश्न उभा केला आहे. या मुलाखतीच्या बाबतीत जॉन्सनने बुमराहबद्दल ‘तो क्वचितच सैल चेंडू टाकतो. कोणत्याही फलंदाजाला त्याचा सामना करण्यासाठी दोनवेळा विचार करावा लागतो.’, असे केलेल्या विधानासह आयसीसीने ट्विट केले होते.

यावर जॉन्सन म्हणाला, ‘हे कोठुन आले आहे? मला काही लक्षात नाही. कोणी लिहिले आहे हे? मला मान्य आहे की यातील काही भाग खरा आहे पण मी कधीही कोणाबरोबर बसून अशी मुलाखत दिलेली नाही.’

त्याच्या या ट्विटनंतर आयसीसीने ती मुलाखत वेबसाईटवरुन काढून टाकली आहे. तसेच आयसीसीने त्याला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण हवे आहे का असेही विचारले आहे. यासाठी त्याला त्यांच्याशी संपर्क साधण्यास आयसीसीने सुचवले आहे.

त्याचबरोबर टाइम्स आॅफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या मुलाखतीबाबत ट्विट करताना त्याने म्हटले आहे की ‘आर्टीकल चांगले आहे पण मी मेलबर्नमध्ये नव्हतो (या मुलाखतीला मेलबर्नची डेटलाइन दिली आहे) आणि मी कोणत्याही पत्रकाराबरोबर बसून मी मुलाखत दिलेली नाही.’

पण त्याच्या या आरोपावर टाइम्स आॅफ इंडियाने सोमवारी(24 डिसेंबर) स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यामध्ये त्यांनी म्हटले आहे की पारंपारिक पद्धतीने ही मुलाखत घेतली गेली नव्हती. तर समालोचनादरम्यान केलेल्या बातचीतमध्ये या गोष्टी बोलण्यात आल्या होत्या.

याबरोबरच त्यांनी जॉन्सनने आयसीसीला केलेल्या ट्विटमध्ये काही भाग योग्य असल्याचे म्हटलेला ट्विटचा फोटो आणि त्यांच्या पत्रकाराचा जॉन्सन बरोबरचा फोटो शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर

कुटुंबाने केलेल्या त्यागाचे, कष्टाचे महाराष्ट्र केसरी बाला रफीकने केले चीज…

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी