भारत जर २०१९ विश्वचषक जिंकला तर कपील देव शर्टलेस धावणार…

2019 च्या विश्वचषकाला आता केवळ पाच महिने उरले आहे. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या या विश्वचषकासाठी सगळेच उत्सुक आहेत. पण या विश्वचषकाआधी भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी धक्कादायक विधान केले आहे.

“भारतीय संघाने 2019चा विश्वचषक जिंकला तर मी शर्टलेस धावणार आहे”, असे कपिल आज तकच्या एका कार्यक्रमात म्हणाले.

“विराटनेही म्हटले आहे की तो ही भारत विश्वचषक जिंकल्यावर शर्टलेस धावणार. देशासाठी मी काहीही करू शकतो”, असेही कपिल म्हणाले.

भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही यावर्षाच्या सुरूवातीला भारत विश्वचषक जिंकला तर ऑक्सफोर्डच्या रस्त्यावर शर्टलेस धावणार असे म्हटले होते.

“माझ्या मते भारत विश्वचषक जिंकेल पण त्यासाठी त्यांना चांगला खेळ करण्याची गरज आहे”, असेही कपिल म्हणाले.

पुढील वर्षी 30 मेला विश्वचषक सुरू होणार आहे. यामध्ये पहिलाच सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा होणार आहे. तर भारत पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिके विरुद्ध साउथँप्टन येथे खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पंचांवर ओरडणं जगातील सर्वात दिग्गज अष्टपैलू खेळाडूला पडले चांगलेच महागात

तो खेळाडू आता खेळत असता तर आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल २५ कोटी

अशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल