आज सचिनबरोबर १२ खेळाडूंनी केले होते एकाच सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण

टी२० क्रिकेटला ज्या देशाने सर्वात मोठा विरोध केला तोच देश अर्थात भारत पुढे जाऊन ह्या क्रिकेटच्या प्रकारातील सर्वात मोठा साम्राज्य बनला. या देशाने आयपीएल सारख्या सर्वात यशस्वी लीग क्रिकेटला २००८मध्ये जन्म दिला. परंतु हा संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना कधी खेळला माहित आहे? बरोबर १२ वर्षांपूर्वी अर्थात १ डिसेंबर २००६ रोजी भारतीय संघ आपला पहिला टी२० सामना खेळला.

विशेष म्हणजे भारतीय संघ आपला पहिलाच सामना जिंकला देखील. हा सामना झाला होता जोहान्सबर्ग येथे आणि विरुद्ध बाजूला संघ होता बलाढ्य दक्षिण आफ्रिका.

दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने त्यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आफ्रिका संघाने फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १२६ धावा केल्या होत्या. त्यात अल्बि मॉर्केलने सर्वोच्च अर्थात २७ धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष १९.५ षटकांत पार करताना ४ फलंदाज गमावले होते. त्यात कर्णधार सेहवाग ३४, दिनेश मोंगिया ३८ आणि दिनेश कार्तिक ३१ यांनी सर्वोच्च धावा केल्या होत्या.

या सामन्यात भारताकडून ११ खेळाडूंनी तर दक्षिण आफ्रिकेकडून टॅरन हॅंडरसनने टी२० पदार्पण केले होते.

या सामन्यातील काही मनोरंजक आकडेवारी-

-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एकमेव जो टी२० सामना खेळला तो हाच. यात सचिनने १० धावा केल्या होत्या.

-भारतीय संघात तेव्हा खेळलेल्या ११ पैकी ४ खेळाडूंनी आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून पूर्णपणे संन्यास घेतला आहे. ज्या सचिन, सेहवाग, आगरकर, झहीर खान यांचा समावेश आहे.

-११ पैकी एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक हे सध्याच्या भारतीय संघाचे भाग आहेत.

-११ पैकी दिनेश मोंगिया आणि एस. श्रीशांत यांच्यावर भ्र्ष्टाचाराचे किंवा मॅच फ़िक्सिन्गचे आरोप आहेत.

-११ पैकी संघात खेळलेले सुरेश रैना, हरभन सिंग, श्रीशांत आणि इरफान पठाण हे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आजही धडपडत आहेत.

-भारतीय संघ जेव्हा आजच्या दिवशी आपला पहिला टी२० सामना खेळला होता तेव्हा ऑस्ट्रेलिया (४), इंग्लंड, न्यूझीलँड आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी ३ तर श्रीलंका, विंडीज, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि बांगलादेश हे प्रत्येकी एक सामना खेळले होते.

-या सामन्यात खेळलेल्या ११ पैकी ३ खेळाडूंनी भारताचे टी२०मध्ये नेतृत्व केले.

-आजपर्यंत भारतीय संघाचं टी२०मध्ये नेतृत्व केलेले केवळ ६ खेळाडू झाले आहेत. ज्यात सेहवाग (१), धोनी (७२), सुरेश रैना(३), अजिंक्य रहाणे(२), विराट कोहली (२०) आणि रोहित शर्मा (१२) यांचा समावेश आहे.

-सचिनने या सामन्यात १ विकेट घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी

हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान

विंडीजचा हा गोलंदाज इंग्लंड संघाकडून खेळण्यास सज्ज, विश्वचषकाचेही स्वप्न होऊ शकते पूर्ण