- Advertisement -

वाढदिवसाच्या दिवशीच त्याने ठोकले त्रिशतक

0 169

धरमशाला । येथे सुरु असलेल्या हिमाचल प्रदेश विरुद्ध पंजाब रणजी सामन्यात प्रशांत चोप्रा या खेळाडूने ३३८ धावांची दणदणीत खेळी केली. विशेष म्हणजे हा खेळाडू आज त्याचा २५वा वाढदिवस साजरा करत आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील १०वा सार्वधिक स्कोर करताना त्याच्या खेळीच्या जोरावर हिमाचल प्रदेशने दुपारच्या सत्रापर्यंत ५ बाद ६३१ धावा केल्या. हे त्याचे पहिलेच त्रिशतक आहे.

हा खेळाडू काल २७१ धावांवर नाबाद होता. याबरोबर त्याने ६७ वर्षात जे कोणत्याही खेळाडूला जमले नाही ते केले. भाऊसाहेब निंबाळकर यांनी १९४८-४९ मध्ये एकाच दिवसात रणजी स्पर्धेत २७७ धावा केल्या होत्या. त्यांनतर अशी कामगिरी कुणालाही करता आली नव्हती.

वाढदिवसाच्या दिवशीच त्रिशतक करणारा प्रशांत चोप्रा हा सर्वात लहान आणि केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कॉलिन कॉवद्रय यांनी १९६२ तर रमण लांबा यांनी १९९५ साली वाढदिवसाच्या दिवशीच त्रिशतक केले होते.

वाढदिवसाच्या दिवशी त्रिशतक करणारे खेळाडू
कॉलिन कॉवद्रय (वय- ३०),१९६२
रमण लांबा (वय-३५), १९९५
प्रशांत चोप्रा (वय-२५), २०१७

We welcome your comments at mahasportsnews@gmail.com

Comments
Loading...
%d bloggers like this: