आणि कारकिर्दीत प्रथमच कोहलीच्या नावापुढे आले १० हजार!

सेंच्युरियन । भारताने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज शिखर धवनने अर्धशतक केले, तसेच भारताकडून युझवेन्द्र चहलने ५ बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

या सामन्यात कोहलीने वनडे कारकिर्दीत  १० हजार चेंडू खेळण्याचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ २५ वा तर भारताचा ६वा खेळाडू  ठरला. 

वनडेत १० हजार चेंडू खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीची सरासरी ही सर्वात जास्त आहे. विराटने आजपर्यंत वनडेत २०४ सामन्यात १००१३ चेंडू खेळले असून त्यात त्याने ५६.३६च्या सरासरीने ९१८८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३३ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. 

कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कोणत्याही प्रकारातून पहिल्यांदाच १० हजार असा शब्द आला आहे.

भारताकडून वनडे कारकिर्दीत सर्वाधिक चेंडू खेळणारे खेळाडू 

२१३९२ सचिन तेंडुलकर 

१५४०१ सौरव गांगुली 

१५२७८ राहुल द्रविड 

१२६६४ मोहम्मद अझरुद्दीन 

१११९२* एमएस धोनी 

१००१३* विराट कोहली