कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कधीही न झालेली धावसंख्या टॉम लेथमने केली

वेलिंग्टन।  न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. यामध्ये आज (17 डिसेंबर) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता श्रीलंकेने 3 विकेट्स गमावत 20 धावा केल्या आहेत. यामध्ये कुशल मेंडिस नाबाद 5 आणि अँजेलो मॅथ्यूज नाबाद 2 धावांवर खेळत आहेत.

न्यूझीलंडने पहिल्या डावात 578 धावा केल्या असून ते 276 धावांनी आघाडीवर आहेत. यामध्ये सलामीवीर टॉम लेथमने नाबाद 264 धावा केल्या आहेत. यात त्याने 21 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

टॉमची ही पहिलीच द्विशतकी खेळी ठरली असून त्याने अॅलिस्टर कूकच्या नाबाद 244 खेळीला मागे टाकले आहे. त्याने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नवर ही नाबाद द्विशतकी खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधील टॉमची ही सर्वोत्तम नाबाद खेळी ठरली आहे.

तसेच टॉम कसोटी क्रिकटच्या इतिहासात नाबाद 264 खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यत कोणत्याही फलंदाजाने 264 ही वैयक्तिक धावसंख्या केलेली नव्हती. म्हणजेच 264 पेक्षा अधिक धावा काही फलंदाजांनी केल्या आहेत पण एखादा फलंदाज 264 धावांवर असताना बाद झालेला नाही किंवा संघाचा डाव संपलेला नाही.

न्यूझीलंड कडून कसोटीमध्ये द्विशतकी खेळी करणारा टॉम हा सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी ब्रेंडन मॅक्युलम, मार्टीन क्रो, रॉस टेलर, स्टिफन फ्लेमिंग आणि ब्रायन यंग यांनी कसोटीमध्ये द्विशतकी खेळी केली आहे.

आतापर्यत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक 264 धावा फक्त दोघांनीच केल्या आहेत. यामध्ये भारताच्या रोहित शर्माचा समावेश असून त्याने 2014ला वन-डेमध्ये 264 धावा केल्या आहेत. तर आज टॉमने नाबाद 264 धावा केल्या आहेत. या दोघांनीही श्रीलंके विरुद्धच या धावा केल्या आहेत.

टॉमने केलेल्या धावा या वर्षामधील सर्वोत्तम वैयक्तिक कसोटी धावा ठरल्या आहेत. याआधी बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने झिम्बाव्बे विरुद्ध 219 धावा केल्या होत्या.

श्रीलंके विरुद्धचा हा कसोटी सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडला सात विकेट्स घेण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एकीकडे टीम इंडिया धावांसाठी झगडत असताना हार्दिक पंड्या रणजी ट्राॅफीत धडका सुरुच

कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मोहम्मद शमी ठरला केवळ ५ वा भारतीय वेगवान गोलंदाज

पंजाबच्या ‘ज्यूनियर युवराज’ने द्विशतक करत केली या मोसमातील सर्वोत्तम खेळी