पहा महिला विश्वचषकातील टॉप- १० झेल

या वर्षीचा महिला विश्वचषक मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला. यापूर्वी महिला विश्वचषकाबद्दल कधीही एवढी चर्चा झाली नव्हती. या लोकप्रियतेमागे आयसीसीच्या अधिकृत सोशल माध्यमांचा वाटाही तेवढाच आहे.

आयसीसीने आपल्या अधिकृत फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम खात्यावरून या विश्वचषकाच्या असंख्य पोस्ट केल्या. त्यामुळे चाहते, जाणकार यांना या खेळाच्या आणखी जवळ जाता आले.

काल आयसीसीने असाच एक खास विडिओ शेअर केला आहे, ज्यात महिला विश्वचषकातील खास झेल दाखवण्यात आले आहेत. त्यातील एक झेल तर एका प्रेक्षकाने इतक्या अविस्मरणीय प्रकारे घेतला आहे जो आपण कधीही विसरू शकणार नाही.

यात तो पेक्षक एका हातात बिअरचा ग्लास असताना दुसऱ्या बाजूला जाऊन एका हाताने झेल पकडतो. यात भारतीय खेळाडूंचे पकडलेले झेल आहेत.

येथे पहा टॉप १० झेलांचा विडिओ-