आजच्या क्रिकेट विश्वातील १० महत्वाच्या घडामोड्या !

आफ्रिदीची ४३ चेंडूत १०१ धावांची शतकी खेळी

काल हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान येथे झालेल्या नेटवेस्ट टी२० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी करत आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. यात त्याने ४३ चेंडूत १०१ धावा केल्या.

भारताला एक चांगल्या डावखुऱ्या गोलंदाजांची गरज आहे – भरत अरुण

“भारतीय संघात आता खूप चांगले गोलंदाज आहेत पण मला भारतीय संघात एक डावखुरा गोलंदाज हवा आहे. कोणत्याही संघाच्या गोलंदाजीत जर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गोलंदाज असतील तर गोलंदाजीतील आक्रमकता वाढते.”

चेतेश्वर पुजारा अर्जुन पुरस्काराने सन्मानित !

भारताचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता चालू असलेल्या श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेत त्याने भारताकडून खेळताना ३ सामन्यात २ शतके लगावली होती, त्याच बरोबर त्याने या पूर्ण कसोटी मोसमात चांगला खेळ केला आहे.

क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला अर्जुन पुरस्कार !

नुकत्याच झालेल्या २०१७ महिला विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीत कौरला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हरमनप्रीतची इंग्लंडमधील डर्बी येथील विश्वचषकातील उपांत्य सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या १७१ धावांची धडाकेबाज खेळी आज ही प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात राष्ट्रगीत होणार नाही

श्रीलंका संघाच्या मीडिया मॅनेजरने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार यापुढच्या कोणत्याही सामन्यात राष्ट्रगीत वाजवण्यात येणार नाही. याला मुख्य कारण म्हणजे श्रीलंकेमधील परंपरा. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात गॅले कसोटीमध्ये राष्ट्रगीत वाजवले गेले होते परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात राष्ट्रगीत वाजविण्यात आले नाही.

भारतीय संघाला मिळाली जर्सी बदलून !

भारतीय संघाला सध्या जर्सी पुरवणाऱ्या नाइके कंपनीच्या जर्सीबद्दल भारतीय संघातील काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. काही खेळाडूंनी या जर्सीच्या दर्जाबद्दल नाराजगी व्यक्त केल्यांनतर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या कानावर घातली.भारतीय संघाबरोबर असलेला करार असाच पुढे सुरु राहण्यासाठी नाइकेने आपले प्रतिनिधी लंकेत पाठवले आहेत. ते खेळाडूंकडून लवकरच याबद्दल अभिप्राय घेणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाला नाइकेकडून दुसरी जर्सी देण्यात आली असून मंगळवारी भारतीय खेळाडूंनी सरावाच्या नवीन जर्सीमध्ये सराव केला. नवीन जर्सी ही दिसायला जुन्याच जर्सी सारखी आहे परंतु नवीन जर्सीचा दर्जा उत्तम आहे.

हे मैदान होणार जेल !

ज्या मैदानावर एकेवेळी युवराज सिंग, कपिल देव, हरभजन सिंग यांसारख्या दिग्गजांनी एकेकाळी सराव केला किंवा ट्रेनिंग घेतले ते मैदान २५ ऑगस्ट रोजी जेल होणार आहे.डेरा सच्चा सौदाचे प्रचारक गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावर सुरु असलेल्या बलात्काराच्या केसचा निकाल चंदिगढ येथील न्यायालयात दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मैदानाला तात्पुरते जेल बनविण्यात येणार आहे.

आज त्यावर्षी सचिन, द्रविड आणि गांगुलीने केल्या होत्या एकाच डावात शतकी खेळी!

आज त्या गोष्टीला १५ वर्ष झाली जेव्हा भारताच्या तीन महान फलंदाजांनी एकाच डावात शतकी खेळी केल्या होत्या. २००२ साली २२ ते २६ ऑगस्ट रोजी लीड्स येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात या तीनही फलंदाजांनी शतकी खेळी केल्या होत्या.

काउंटी खेळून तुम्ही क्रिकेटपटू म्हणून सुधरू शकता – चेतेश्वर पुजारा

काउंटी क्रिकेट खेळून तुम्ही त्या वातावरणाशी आणि वेगवान धावपट्टीशी जुळवून घेता. यामुळे आपल्या तंत्रात काही बद्दल होत नाही, हा फक्त एक अनुभव असतो. एकदा का तुम्ही तुमच्या क्रिकेट तंत्रात स्थिर झाला की बाकी गोष्टींचा जास्त फरक पडत नाही.

अपयशाची भीती आणि आत्मविश्वास नसल्याने श्रीलंका हारत आहे :महेला जयवर्धने

श्रीलंकच्या बाकी माजी क्रिकेटपटूंप्रमाणेच माजी कर्णधार महेला जयवर्धनेही श्रीलंकेच्या खराब कामगिरीमुळे निराश आहे. महेलाने आत्मविश्वासाचा अभाव आणि अपयशाच्या भीती या करणामुळे श्रीलंकेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे निराशाजनक कामगिरी राहिली आहे असे नमूद केले.