टॉप १०: भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील विक्रम !

पल्लेकेल: येथे सुरु असलेली तिसरी आणि शेवटची कसोटी भारताने १ डाव आणि १७१ धावांनी जिंकून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. याबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने प्रथमच परदेशात एखाद्या संघाला व्हाइट वॉश दिला आहे.

श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात निरोशन डिकवेल्ला ४१, चंडिमल ३६ आणि अँजेलो मॅथेव ३५ यांनी थोडाफार प्रतिकार केला, भारताकडून मोहम्मद शमी ३, आर अश्विन ३, उमेश यादव २ तर कुलदीप यादव १ यांनी विकेट्स घेतल्या .

ही संपूर्ण मालिकाच एकतर्फी झाली. त्यामुळे विक्रम हे ओघानेच आले. त्यातील काही ठळक विक्रम…

#१ भारताने दुसऱ्यांदा श्रीलंकेला व्हाईट वॉश दिला आहे. १९९४ साली भारतात ३-० आणि आता श्रीलंकेत ३-०

#२ २९ कसोटी सामन्यानंतर सार्वधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट कोहली १९ विजयासह दुसऱ्या स्थानी. स्टिव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांनी २१ सामने जिंकले आहेत.

#३ भारताने प्रथमच परदेशात एखाद्या देशाला ३-० असा व्हाईट वॉश दिला आहे.

#४ भारताचा परदेशातील डावाच्या फरकाने हा दुसरा मोठा विजय. यापूर्वी बांगलादेश विरुद्ध २००७ साली १ डाव आणि २३९ धावांनी भारताने सर्वात मोठा विजय मिळवला होता.

#५ श्रीलंकेत श्रीलंकेविरुद्ध सलग ५ सामने जिंकणारा भारत पहिला देश

#६ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आर अश्विनच्या १७४ विकेट्स.

#७ भारताने ५व्यांदा ३ किंवा अधिक कसोटी सामने असणाऱ्या मालिकेत विरोधी संघाला व्हाईट वॉश दिला आहे.

#८ भारताने आजपर्यंत कधीही १५ ऑगस्टला कोणताही आंतरराष्ट्रीय सामना जिंकला नाही. यावेळी ती संधी होती परंतु लंकेचा संघ आधीच ऑल डाउन झाला.

#९ श्रीलंका संघ ४थ्यांदा घराच्या मैदानावर व्हाईट वॉशचा शिकार ठरला आहे.

#१० भारतापूर्वी एखाद्या संघाला त्यांच्या देशात व्हाईट वॉश २००६ साली ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दिला होता.

#११ भारताचा हा श्रीलंकेविरुद्धचा हा आजपर्यंतचा डावाच्या फरकाने सर्वात मोठा विजय आहे.