टॉप १०: भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी झाले हे विक्रम !

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात आज दिवसाखेर भारताने ९० षटकांत ६ विकेट्सच्या बदल्यात ३२९ धावा केल्या. यात सलामीवीर शिखर धवनच्या शतकी खेळीबरोबर केएल राहुलच्या ८५ तर विराट कोहलीच्या ४२ धावांचा समावेश आहे.

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी असंख्य विक्रम आपल्याला पाहायला मिळाले. महा स्पोर्ट्सच्या आकडेवारी टीमने याचा घेतलेला हा आढावा…

#७
केएल राहुलने कसोटीमध्ये सलग ७ डावात अर्धशतकी खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील ६वा कसोटीपटू ठरला आहे.

#७
भारताकडून कसोटी डावात सार्वधिक सलग अर्धशतके करण्याचा विक्रम राहुलने आपल्या नावे केला आहे.भारताकडून गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांनी सहा सलग अर्धशतकं ठोकली आहेत.

#७
केएल राहुलला सलग ७ डावात अर्धशतकी खेळी करताना एकही खेळीचे रूपांतर शतकात करता आलेले नाही. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलिया ख्रिस रॉजर्सच्या नावावर होता. रॉजर्सने सलग सात डावात अर्धशतकी खेळी केल्या होत्या.

#६
शिखर धवनने आजपर्यंत ज्या ६ शतकी खेळी केल्या आहेत त्यातील ५ या भारताबाहेर केल्या आहेत.

#२
२०११ नंतर परदेशी भूमीवर भारतीय सलामीवीराने कसोटी मालिकेत दोन शतकी खेळी करण्याची ही पहिली वेळ आहे. २०११ला इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविडने सलामीवीराच्या जागी येऊन २ शतकी खेळी केल्या होत्या.

#३
श्रीलंकेत ३ शतके करण्यासाठी धवनने केवळ ६डाव घेतले आहेत. हा भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम आहे. सचिन आणि चेतेश्वर पुजारा यांनी अशी कामगिरी ५ डावात केली आहे.

#१

पहिल्यांदाच एखाद्या संघाने कसोटी मालिकेत सर्व कसोटी सामन्यांच्या पहिल्या दिवशी ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारताने गॉल कसोटीमध्ये ३९९/३, कोलंबो कसोटीमध्ये ३४४/४ आणि आज पल्लेकेल कसोटीमध्ये ३२९/६ धावा केल्या आहेत.

#१८८
भारताच्या सलामीवीरांनी आज १८८ धावांची भागीदारी केली. अन्य खेळाडूंनी मिळून १४१ धावांची भागीदारी केली.

#७
या कसोटी मालिकेत ९ पैकी ७ दिवस दिवसात ३०० पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. हा श्रीलंकेमधील विक्रम आहे.

#१८८
श्रीलंकेतील सलामीवीरांनी केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदारी आहे. यापूर्वी अटापटू- जयसूर्या जोडीने ३३५ आणि १९३ धावांची सलामी कसोटीमध्ये दिली होती.