२०१७मध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू ठरू शकतात भारतीय कबड्डीचे भविष्य !

प्रो कबड्डीचा विचार केला तर 2017 हे वर खऱ्या अर्थाने सार्थक झाले. या वर्षी प्रो कबड्डीचा मोसम दीड महिन्याच्या कालावधी ऐवजी वाढवून तीन महिन्यांच्या करण्यात आला. मागील चार मोसमात प्रो कबड्डीमध्ये 8 संघ खेळायचे. या मोसमात चार नवीन संघ घेऊन संघांची संख्या 12 केली गेली. खेळाडूंना लिलावाच्या वेळी भरघोस रक्कम मिळाली. नितीन तोमर 1 कोटीचा पल्ला गाठण्याच्या खूप जवळ गेलं होतं. त्याला सर्वाधिक 93 लाख रुपये मिळाले.

कबड्डीसाठी चांगली गोष्ट म्हणजे क्रिकेतनंतर सर्वाधिक जास्त विव्हरशीप प्रो कबड्डीला मिळाली. अनेक नवोदित खेळाडू प्रो कबड्डीने आपणाला दिले जे उद्या भारताचे नेतृत्व करताना आपणास पाहायला मिळू शकतात. त्यामुळे या लेखात आपण अश्या खेळाडूंचा विचार करणार आहोत हे 2017 मध्ये नावारूपास आले आणि जे कबड्डीचे भविष्य असणार आहेत.

5.सुरींदर सिंग- ( यु मुंबा )
यु मुंबा संघ प्रो कबड्डीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक संघ आहे. या संघाची वेगळी अशी ओळख आहे आणि या संघाचे पाठीराखे भारतात सर्वत्र आढतात. परंतु हा संघ या मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान बनवू शकला नाही. त्याचे कारण त्यांचा कमजोर बचाव. रेडींग विभागात या संघाकडे अनुप कुमार आणि काशीलिंग आडकेसारखे रथी महारथी होते पण डिफेन्समध्ये हा संघ कमी पडला.डिफेन्समध्ये या संघासाठी गुण कमावले ते सुरींदरने.

अवघ्या 19 वर्षे वय असलेल्या सुरींदरने 22 सामने खेळताना 58 गुण मिळवले. ते सर्व त्याने फक्त डिफेन्समध्ये मिळवले. पाचव्या मोसमात डिफेन्समध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरींदार 8 व्या स्थानी होता. राईट कव्हर म्हणून खेळताना कमावलेले हे गुण खूप आहेत. कव्हर म्हणून खेळणाऱ्या खेळाडूंपैकी फक्त सुरजीत सिंग सुरींदरच्या पुढे आहे.

4.जयदीप-
पटणा पयरेट्सचा हा गुणी खेळाडू पटणाच्या डिफेन्सची खरी ताकद ठरला. सचिन शिंगाडे, विशाल माने सारखे खेळाडू डिफेन्समध्ये असून देखील जयदीने त्यांच्या छायेच्या बाहेर येत जबरदस्त खेळ केला.

25 वर्षीय जयदीपने 26 सामने खेळताना 71 गुण मिळवले होते. हे सर्व गुण त्याने फक्त डिफेन्समध्येच मिळवले होते. डिफेन्समध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने चौथा क्रमांकावर झेप घेतली.

3.विशाल भारद्वाज-
हा खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळणाच्या अगोदर पासूनच चर्चेत आला होता. तेलुगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरी त्याच्या खेळाचे कौतुक अनेक मुलाखतीत करत होता. विशालने तेलुगुच्या डिफेन्सची धुरा लिलया पेलली.

20 वर्षीय विशालने प्रो कबड्डीच्या 5व्या मोसमात 22 सामन्यात खेळताना 71 गुण मिळवले. हे सर्व गुण त्याने डिफेन्समध्येच मिळवले होते.

2.मोनू गोयत-
पाटणा पयरेट्सचा हा गुणी खेळाडू चौथ्या मोसमापासून प्रो कबड्डीशी जोडला गेला आहे परंतु या मोसमात त्याने आपल्या कामगिरीचा स्थर उंचावला. मागील मोसमात 63 गुण कमावणाऱ्या मोनूने या मोसमात 202 गुण कमावले. परदीप नरवाल आणि त्याची जुगलबंदी प्रेक्षकांना रोमांचित करत होती तर विरोधी संघाची डोकेदुखी बनत होती.

मोनूने मोक्याच्या वेळी गुण तर मिळवलेच पण परदीप नरवाल बाद झाल्यानंतर लगेच त्याला कोर्टवर आणण्याची जबादारी उत्तमरीत्या निभावली. पटणाला विजेतेपद जिंकून देण्यात परदीपचा जेवढा वाटा आहे तेवढाच मोनुचा आहे. त्यामुळे तो भारतीय कबड्डीचे नक्कीच भविष्य ठरू शकतो.

1.सचिन-
2017 या वर्षात कबड्डीला गवसलेला हिरा म्हणजे सचिन. वयाची अवघे 18 वर्षे पूर्ण करताच त्याला प्रो कबड्डीमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
गुजरात फॉरचूनजायेनट्ससाठी डिफेन्समध्ये खप मोठेमोठे धुरंधर होते. परंतु रेडिंगची जबाबदारी पेलली ती सचिनने. गुजरातचा कर्णधार सुकेश हेगडे लयीत नसताना सचिनने रेडिंग विभाग सांभाळत सामने जिंकून दिले.
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात सचिनने 24 सामने खेळताना 173 गुण मिळवले होते. त्यातील 159 गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले होते तर उर्वरित 14 गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले होते.

रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही पातळ्यांवर सचिन उत्तम कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो. त्याचे वय आणि त्याची कौशल्ये लक्षात घेता तो खऱ्या अर्थाने भारतीय कबड्डीचे भविष्य आहे असे म्हणावे लागेल.