टाॅप ५- यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करताना २०१८मध्ये १००० धावांचा टप्पा पार केला.

त्याने यावर्षी कसोटीत ९ सामन्यांत ५९.८८ च्या सरासरीने १०१८ धावा केल्या. यात त्याच्या ४ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

यावर्षी कसोटीत केवळ विराट कोहलीने १ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा जो रुट असून त्याने १० कसोटीत ७१९ धावा केल्या आहेत.

२०१८मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

१०१८- विराट कोहली, सामने- ९

७१९- जो रुट, सामने- १०

६६०- एडम मार्क्रम, सामने- ९

६३८- एबी डिव्हीलियर्स, सामने- ७

६१९- कुशल मेंडीस, सामने- ७

महत्त्वाच्या बातम्या-

आजपर्यंत २९३ भारतीय खेळाडूंना जे जमले नाही ते विराटने करुन दाखवले

तलवारबाजी स्टाईल सेलिब्रेशनसह राजकोट बाॅय जडेजाचा खास विक्रम

टीम इंडियाकडून खेळलेल्या खेळाडूचे पंचासोबत भांडण, तब्बल २० मिनीटं थांबवला सामना

रिषभ पंत आणि षटकारांच नातं काही खास