प्रो कबड्डी: चेन्नई लेगमधील हे आहेत टॉप ५ रेडर

प्रो कबड्डीमध्ये सध्या एकूण १२ संघ खेळतात. या १२ संघातील प्रत्येक संघ प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी चुरशीने लढत आहे.

चेन्नई लीगमध्ये सध्या सर्वात जास्त गुण घेणारा संघ म्हणजे गुजरात फॉरचून. जायन्टसचे त्यांनी २० सामन्यात १३ सामने जिंकलेले असून ४ सामने हरलेले आहेत तर ३ सामन्यात बरोबरी झालेली आहे. त्यांनी आतापर्यंतच्या सामन्यात ७७ गुण मिळविलेले आहेत.

तर सर्वात कमी गुण असलेला संघ म्हणजे दबंग दिल्ली. १९ सामन्यांमध्ये फक्त ४ सामने जिंकलेले असून १३ समाने हरलेले आहेत. तर २ सामन्यात बरोबरी करण्यात ते यशस्वी झालेले आहे. तर तमील थलाइवाज या संघाचीही तीच परिस्थिती आहे. १९ सामन्यांमध्ये फक्त ४ सामने जिंकलेले असून १३ सामने हरलेले आहेत. तर २ सामन्यात बरोबरी झालेली आहे. तमील थलाइवाज संघ प्ले ऑफमध्ये सामील होण्याची संधी खूपच कमी आहे.

मागच्या आठवड्यातील चेन्नई लेगमधील हे आहेत टॉप ५ रेडर

# दीपक निवास हुड्डा-
पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक निवास हुड्डा हा त्याच्या रेडर कौशल्यासाठी खूपच लोकप्रिय आहे. त्याची ही शैली आपल्याला प्रत्येक सामन्यात पाहायला मिळते. मागील २ सामन्यात १५ गुण मिळवले असून प्रत्येक सामन्यात त्याच्या ११ रेड्स पडलेल्या आहेत. यु.पी. योद्धाच्या सामन्यात त्याने शेवटच्या रेडवर १ गुण मिळवून संघाला जिंकवून दिले आहे. सुपर रेडमध्ये त्याचा पहिल्या ३ खेळाडूंमध्ये क्रमांक लागतो.

# मनिंदर सिंघ-
बेंगाल वॉरियर्स संघाचा रेडर मनिंदर सिंघ याने १८ सामन्यांमध्ये फक्त रेडवरच १६० गुण मिळविले असून उरलेले २ गुण टॅकल पॉईंटवर मिळविले आहे. त्याने मागच्या आठवड्यात झालेल्या २ सामन्यात २१ गुण मिळविले असून जयपुर पिंक पँथर्स संघाबरोबर झालेल्या सामन्यामध्ये त्याने १६ गुण मिळवून सर्वात जास्त संघामध्ये त्यानेच गुण मिळविले. मोहीत चिल्लर, कमल किशोर,सुनील यांसारख्या डिफेंडरच्या तावडीतून तो सहज बाहेर निघतो.

# राहुल चौधरी-
तेलुगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरी हा त्याच्यात असलेली चपळाईमुळे कित्येक वेळा डिफेंडरलासमजायच्या आधीच बाद करून येतो. माघील २ सामन्यात त्याने २७ गुण मिळविले आहेत. राहुल चौधरीचा सुपर टेनमध्ये पहिल्या पाच खेळाडूंमध्ये समावेश होतो. २१ सामन्यांमध्ये त्याने १८८ गुण मिळविले असून या मोसमात तो गुणांसाठी २ क्रमांकावर आहे. तर प्रदीप नरवाल हा पहिल्या क्रमांकावर आहे.

# रोहीत कुमार-
बेंगलुरू बुल्सचा कर्णधार रोहीत कुमार हा आपल्या संघाला जिंकविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. त्याचे १८ सामन्यांमध्ये १५६ रेड गुण आहेत तर एकूण गुण १६५ आहेत. मागच्या सामन्यात तमील थलाइवाज विरुद्ध त्याने १५ गुण मिळवून संघाला जिंकविण्यास मदत केली होती. तर २ सामन्यात त्याने २९ गुण मिळविले होते.

 

# अजय ठाकूर-
या आठवड्यातील पहिल्या क्रमांकावरचा खेळाडू म्हणजे अजय ठाकूर. तमील थलाइवाजचा कर्णधार अजय ठाकूरने मागच्या २ सामन्यात ३० गुण मिळविले होते. पहिल्या ४ सामन्यांमध्ये त्याने सर्वात जास्त गुण मिळविले. तसेच संघामध्येही तो सर्वात जास्त गुण घेणारा खेळाडू आहे. ६ सामन्यामध्ये त्याने ७४ रेडपॉइंट मिळविले आहेत. परंतु त्याला संघाची साथ मिळाली नसल्यामुळे त्यांना पाहिजे अशी कामगिरी करता आली नाही.