Top 5: या ५ खेळाडूंना मिळाले आहेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

केपटाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त शतकी खेळी केली.

एका बाजूने नियमित अंतराने विकेट्स जात असतानाही आपल्याला जगातील मर्यादित षटकांतील सर्वोत्तम खेळाडू का म्हणतात हे आज विराटने दाखवून दिले. वनडे कारकिर्दीतील ३४वे शतक करताना विराटने अतिशय संयमी परंतु वेळ आली तेव्हा तेवढीच स्फोटक खेळी केली.

त्याने १५९ चेंडूचा सामना करताना १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १६० धावांची खेळी केली.

या खेळीमुळे विराटला या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. विराटचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ४४ वा सामनावीर पुरस्कार होता तर वनडेतील २७वा सामनावीर पुरस्कार.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असून ६६४ सामन्यात सचिनला ७६ पुरस्कार मिळाले आहेत तर ५६८ सामन्यात श्रीलंकेचा महान अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्याने ५८ सामनावीर पुरस्कार घेतले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे खेळाडू

७६- सचिन तेंडुलकर (सामने-६६४)
५८- सनथ जयसूर्या (सामने- ५६८)
५७- जॅक कॅलिस (सामने-५१९ )
५०- कुमार संगकारा (सामने-५९४ )
४९- रिकी पॉन्टिंग (सामने-५६०)
४४- विराट कोहली (सामने-३२६ )

सध्या खेळत असलेल्या (निवृत्त न झालेल्या खेळाडूंमध्ये) वनडेतही सामनावीर पुरस्कार सर्वाधिक असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता एबी डिव्हिलिअर्स आणि युवराज सिंगबरोबर अव्वल स्थानी आला आहे.

२७- विराट कोहली (सामने-२०५ )
२७- एबी डिव्हिलिअर्स (सामने-२२५ )
२७- युवराज सिंग (सामने-३०४ )
२१- एमएस धोनी (सामने-३१५ )
१८- हाशिम अमला (सामने-१६१ )
१८- मार्टिन गप्टिल (सामने-१५४ )
१८- शाकिब उल हसन (सामने-१८५ )
१८- शोएब मलिक (सामने-२६१ )