२०१८ प्रीमियर लीग ट्रान्सफर विंडोमधील पहिले पाच महागडे फुटबॉलपटू

प्रीमियर लीगमध्ये एफ एच्या नवीन नियमानुसार ट्रान्सफर विंडो ९ ऑगस्टलाच बंद झाली. या लिलावात करारबध्द झालेले पहिले पाच महागडे फुटबॉलपटू

१) केप अरिझबालागा– थिबो कोर्टवा याने रियल माद्रिदशी करार केल्याने त्याच्या जागी चेल्सीने अॅथलेटिक बिलबओच्या केपला संघात घेऊन जागतिक विक्रमच केला आहे. या २३ वर्षीय गोलकीपरला चेल्सीने ७१.६ मिलीयन पौंडमध्ये सात वर्षासाठी करारबध्द केले. केपची मागील एक वर्षाची कामगिरी बघून मी त्याला घेण्याचे ठरवले, असे चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी म्हणाले.

Photo Courtesy: twitter/ ChelseaFC

२) रियाद महारेझ- लिसेस्टर सिटीकडून खेळणारा हा फुटबॉलपटू मॅंचेस्टर सिटीने ६१ मिलीयन पौंडमध्ये करारबध्द केला. यातच मॅंचेस्टरने काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षक पेप गार्डीओला यांच्या प्रशिक्षणाखाली एफए कम्युनिटी शील्ड जिंकली. यामध्ये संघात रियादचा समावेश होता. काही दिवसांपासूनच मॅंचेस्टर सिटी क्लब आणि रियादमध्ये ट्रान्सफरबाबत चर्चा होत होती.

Photo Courtesy: twitter/ ManCity

 

३) अॅलिसन बेकर- या ब्राझीलियन गोलकिपरला लीव्हरपुलने ५७ मिलीयन पौंडमध्ये घेतले. त्यावेळी तो सगळ्यात महागडा फुटबॉलपटू ठरला होता. याने इटलीच्या सेरी ए या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.

Photo Courtesy: twitter/ LFC

४) फ्रेड रोड्रुगीझ- मॅंचेस्टर युनायटेडने या २५ वर्षीय ब्राझीलियन फुटबॉलपटूसाठी ६१.२ मिलीयन पौंड मोजले आहेत. पॉल पोग्बा आणि नेमांजा मॅटीच यांच्या बरोबर फ्रेडची भर पडल्याने युनायटेडची मिडफिल्डरची भींत पक्की झाली आहे.

Photo Courtesy: twitter/ CBF_Futebol

५) जोरगिन्हो- इटलीचा हा फुटबॉलपटू सुरूवातीला मॅंचेस्टर सिटीमध्ये जाणार अशी चर्चा होती, मात्र शेवटी चेल्सीने या माजी नॅपोली क्लब मिडफिल्डरला ५७ मिलीयन पौंडमध्ये खरेदी केले.

Photo Courtesy: twitter/ ChelseaFC